लोकसभा निवडणुकीला अवकाश असला, तरी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीबद्दलचा एक अहवाल चांगलाच चर्चेत आला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा अहवाला पक्षाला दिल्याचंही म्हटलं गेलं. या अहवालाच्या बातम्या आल्यानंतर आता विनोद तावडेंनी त्याबद्दल खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणूक 2024, भाजपची समिती आणि अहवाल… प्रकरण नेमकं काय?
अशी माहिती चर्चेत आली की, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशातील राजकीय परिस्थितीचा आणि मतदारांच्या मनाचा आदमास घेण्यासाठी भाजपने राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमली होती.
हेही वाचा >> अजित पवारांमुळे बंड करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना आता ‘दादा’च हवेत!
या समितीने प्रत्येक राज्यातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, अभ्यासक-विश्लेषक आणि नेत्यांकडून माहिती घेतली. राज्यानिहाय अहवाल या समितीने तयार केला. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा अहवाल सादर केला गेला, असंही काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
त्या अहवालात काय?
तर समोर आलेल्या माहितीनुसार 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला नुकसान होणार असल्याचं या अहवालात म्हटलं असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात 42 खासदार युतीचे निवडून आले. पण, 2024 मध्ये भाजप-युतीचे 22 ते 25 पेक्षा अधिक खासदार निवडून येणार नसल्याचं या अहवालात आहे, असंही काही वृत्तांमध्ये म्हटलं गेलं.
विनोद तावडेंनी केला खुलासा
अहवालाच्यासंदर्भातील वृत्त काही माध्यमांनी दिल्यानंतर आणि सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
हेही वाचा >> मुद्दा भाजपसोबत जाण्याचा पण, अजित पवारांनी संजय राऊतांना झापले!
विनोद तावडे यांनी एक ट्विट केलं. ज्यात ते म्हणतात, “दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT