Rahul Gandhi Lok Sabha: नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे तब्बल 139 दिवसांनी लोकसभेत (Loksabha) परतले. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध (PM Modi) अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत त्यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी भारत जोडो, मणिपूर (Manipur) मुद्द्यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मात्र हे भाषण करताना राहुल गांधी जेव्हा मणिपूरच्या मुद्द्यावर बोलत होते तेव्हा कॅमेरा त्यांच्यावर न ठेवता अध्यक्षांवरच जास्त ठेवल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. (when rahul gandhi was speaking on issue of manipur in lok sabha there was only 4 minutes of camera on him congress has alleged)
ADVERTISEMENT
हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे? आणि यासंदर्भात महाराष्ट्र काँग्रेसनी काय ट्विट केलं आहे हे सविस्तरपणे पाहूयात…
‘हुकूमशहा किती घाबरट आहे… खा. राहुलजी गांधी लोकसभेत मणिपूरवर १५ मिनिटे ४२ सेकंद बोलले. या दरम्यान @sansad_tv वर ११ मिनिटे ८ सेकंद स्पीकर ओम बिरला यांनाच दाखवले गेले. खा. राहुलजी गांधी यांना फक्त ४ मिनिटे दाखवले. हे आहे खरं..’
असं ट्वीट करत काँग्रेसने लोकसभेत विरोधकांसोबत दुजाभाव होत असल्याचा आरोप केला आहे.
खासदार कनिमोळींच्या भाषणावेळीही DMK खासदारांनी सत्ताधारी भाजपवर साधला निशाणा
दरम्यान, यानंतर डीएमकेच्या खासदार कनिमोळी या जेव्हा बोलायला उभ्या राहिल्या. तेव्हा देखील अशाच प्रकारचे आक्षेप घेण्यात आले. जेव्हा कनिमोळी या मणिपूर आणि तेथील महिलांवर होणाऱ्या अन्यायाबाबत बोलत होत्या.. त्यावेळी अनकेदा फक्त लोकसभा अध्यक्षांचीच फ्रेम दाखवली जात होती. त्यामुळे DMK च्या खासदारांनी याबाबत तात्काळ या मुद्द्यावर आक्षेप घेतला.
हे ही वाचा >> Rahul Gandhi: ‘रावणाप्रमाणेच मोदीजी सुद्धा दोन जणांचं…’, राहुल गांधींनी मोदींना भयंकर डिवचलं!
ज्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी असं म्हटलं की, ‘कोणावरही अन्याय केला जात नाहीए.. योग्य पद्धतीने संसदेचं काम सुरू आहे.’
मात्र त्यानंतरही अनेकदा डीएमके खासदार हे कनिमोळींना दाखवत नसल्याने आक्षेप घेत राहिले. यावेळी कनिमोळी उपहासाने असंही म्हणाल्या की, ‘त्यांनी आपली भीती वाटत आहे. किमान आपल्याला मणिपूरच्या मुद्द्यावर बोलायला मिळतंय तेही नसे थोडके..’ असं म्हणत कनिमोळी यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली.
हे ही वाचा >> Rahul Gandhi: ‘शाहा, अदाणी अन् रावण…’, लोकसभेत परताच तुफान हल्ला, भाषण जसंच्या तसं
दरम्यान, अविश्वास प्रस्तावादरम्यान विरोधकांनी मोदी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. तर दुसरीकडे भाजपकडून देखील विरोधकांच्या आरोपांना उत्तरं देण्यात आली.
एकीकडे आज (9 ऑगस्ट) राहुल गांधींनी थेट मोदींवर हल्ला चढविल्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे उद्या (10 ऑगस्ट) त्यांना काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच मणिपूरच्या मुद्द्यावर ते नेमकं काय बोलणार याकडेही अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT