Sanjay Raut Criticize Eknath Shinde on Barsu Refinery : रत्नागिरीच्या राजापूरमधील प्रस्तावित बारसू रिफायनरी (Barsu Refinery) प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दैनिक ‘सामना’तील रोखठोक या साप्ताहिक सदरातून शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला चढवला आहे. कोकणची जनता प्रकल्पांना विरोध करते हा प्रचार चुकीचा आहे.विरोध नसतानाही वेदांता फॉक्सकॉन, एअरबस सारखे प्रकल्प महाराष्ट्रातून का गेले? याचे उत्तर उद्योग मंत्री उदय सांमत (Uday Samant) यांनी द्यावे,असे संजय राऊत म्हणाले आहेत.(why did vedanta foxconn airbus projects go through maharashtra sanjay raut ask question to government)
ADVERTISEMENT
मुंबईचे जागतिक पातळीवरील महत्व कमी करण्याचे कारस्थान गुजरातच्या भूमीतून सुरु आहे, असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी केला. मुंबई यापुढे देशाची आर्थिक राजधानी राहू नये यासाठी जी कारस्थाने दिल्लीच्या पातळीवर चाललीत, ती रोखायची हिम्मत मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्याकडे आहे का? असा सवाल देखीव संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी उपस्थित केला.
हे ही वाचा : भाजपचा विजय अन् महाविकास आघाडीचा पराभव : राष्ट्रवादीचा नेता तुफान नाचला…
रिफायनरी कोकणच्या फायद्याची ज्यांना वाटते त्यांनी मुंबईतीली माहुल-चेंबूर परिसरात जाऊन तिथल्या लोकांची अवस्था पाहावी. माहुलमध्ये मुले जन्माला येतात ती श्वसन आणि त्वचेचे विकार घेऊन. त्यामुळे माणसाच्या जिवाचीच जेथे शाश्वती नाही तिकडे काय करायचेत हे विषारी प्रकल्प? असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या सुट्टीवरून देखील टीका केली. मुख्यमंत्री रजेवर का गेले? रजा कोणाकडून मंजूर करून घेतली? मुख्यमंत्र्यांचे सरकार म्हणजे 40 डोक्यांचा रावण, हे समजून घेतले तर त्यांच्या रजेचा उलगडा होईल,असा हल्लाबोल देखील संजय राऊत यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
विकास कोणाला नको आहे? तो हवाच आहे, पण विनाशाच्या पायावर तो उभा नसावा. पंतप्रधान मोदी विकासाच्या गोष्टी करतात, तो विकास म्हणजे थोतांड ठरले. मर्जीतल्या लोकांचा श्रीमंती वाढवणारा विकास काय कामाचा? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला. नाणार व बारसू परिसरात परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात जमिनीचे व्यवहार करून ठेवले आहेत.त्यामुळे रिफायनरी झाली नाही तर या परप्रांतीयांचे नुकसान होईल असा खुलासा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
ADVERTISEMENT