‘दादुड्या “मूछ” कधी काढतोय?’ संतोष बांगरांना चॅलेंज अंगलट, काढाव्या लागणार मिशा?

मुंबई तक

• 03:55 PM • 01 May 2023

बाजार समितींमधील पराभव शिवसेना आमदार संतोष बांगर यांना महागात पडलं आहे. कारण सभेत त्यांनी एक चॅलेंज दिलं होतं. ज्यावरुन विरोधक त्यांना डिवचत आहेत.

will shiv sena mla santosh bangar remove his mustache now apmc election result

will shiv sena mla santosh bangar remove his mustache now apmc election result

follow google news

हिंगोली: हिंगोलीचे शिवसेना (Shiv Sena) आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) गेले तेव्हापासूनच ते वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण आता बांगर वादात नाही, तर स्वतःच दिलेल्या चॅलेंजमुळे चर्चेत आले आहेत. बाजार समिती निवडणुकीत मिशा कापण्याचं चॅलेंज दिलं होतं. आता हेच चॅलेंज संतोष बांगरांच्या अंगलट आलं आहे. बांगरांनी व्हायरल व्हिडिओत नेमकं काय चॅलेंज दिलं, आणि कळमनुरी बाजार समितीचा रिझल्ट काय लागला, हेच आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. (will shiv sena mla santosh bangar remove his mustache now apmc election result)

हे वाचलं का?

कळमनुरी बाजार समितीचा निकाल लागला. शिवसेना आमदार संतोष बांगर विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली. मविआने आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे निवडणूक लढवत बांगरांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. आणि हाच प्रयत्नात बांगरांचा गेम झाला.

17 पैकी केवळ 5 जागांवर बांगरांच्या पॅनेलला समाधान मानावं लागलं. तर मविआला तब्बल 12 जागा मिळाल्या. मविआने बांगरांना चारीमुंड्या चीत केलं. पण गोष्ट निकालानंतर संपली नाही, तर बांगर स्वतःच दिलेल्या एका चॅलेंजमुळे अडचणीत आले आहेत.

हे ही वाचा>> ‘गद्दारी झाली तेव्हा ठाकरेंना पहिला फोन सोनिया गांधींचा’, म्हणालेल्या तुम्ही…

औंढा नागनाथ इथे बाजार समितीच्या प्रचारसभेत बोलताना बांगरांनी मिशा कापण्याची भाषा केली होती. आता निकालानंतर त्यांचे विरोधक हाच व्हिडिओ शेअर करत बांगरांना आता मिशा कापा, असं म्हणत डिवचत आहेत.

पाहा यावेळी संतोष बांगर नेमकं काय म्हणालेले:

संतोष बांगर यावेळी म्हणालेले, ‘ कळमनुरी मतदारसंघात तुम्ही बिझी असल्यामुळे तुम्हाला माहित नाही.. पण कळमनुरी मतदारसंघात अंकुशराव.. राष्ट्रवादी, भाजप.. आपलं भाजप सोबत आहे.. शिवसेना उरलेली-सुरलेली.. त्यानंतर काँग्रेस, वंचित हे सगळे एक झाले. पण आजही तुम्हाला सांगतो.. नागनाथाचं मंदिर आहे इथे समोर.. ध्यानात ठेवा. 17 पैकी 17 सीट कळमनुरीच्या निवडून नाही आल्या तर हा संतोष बांगर ही मिशी ठेवणार नाही. ध्यानात ठेवा.. आलं का लक्षात बाबा..? आपल्याला ते जमणारच नाही.. म्हणून तुम्हा सगळ्या मतदारांना विनंती करण्यासाठी आलो आहे.’

विरोधकांनी संतोष बांगरांना डिवचलं!

पण आता संतोष बांगरांना स्वतःचं दिलेलं चॅलेंज अंगलट आलं आहे. 17 पैकी 17 जागा जिंकणार असं म्हणालेले. पण केवळ 5 जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यामुळेच आता बांगर मिशा कापणार का?, यावरून विरोधक त्यांना सातत्याने डिवचत आहेत.

हे ही वाचा>> ‘उद्धवला आण, बघतो कसा येतो तो,’नारायण राणेंचे थेट आव्हान

‘प्रिय लाडक्या संतोष दादुड्या “मूछ” कधी काढतोय मग?’ असं म्हणत अयोध्या पोळ-पाटील (Ayodhya Poul-Patil) यांनी तर चक्क एक रेझर दाखवत संतोष बांगर यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता संतोष बांगर त्यांनी दिलेलं चँलेज पूर्ण करणार का? अशी चर्चाच संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.

    follow whatsapp