IRS अधिकारी समीर वानखेडेंची 'ही' मोठी अडचण, नेमकं घडलंय तरी काय?

मुंबई तक

• 08:31 PM • 18 Oct 2024

IRS Sameer Wankhede: समीर वानखेडे हे लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरी त्यांच्यासमोर काही अडचणी देखील आहेत.

follow google news

Sameer Wankhede Vidhansabha Election 2024: मुंबई: महाराष्ट्रात निवडणुकांचं बिगुल वाजलंय. 20 नोव्हेंबरला निवडणूक आणि 23 नोव्हेंबरला निकाल येतोय. आता यासाठीही फिल्डिंग लावण्याचं काम सगळे पक्ष करताहेत. शिवाय अनेक नेते आणि चर्चेत असलेली मंडळी देखील लगबगीनं कामाला लागलीत. यातच आता डॅशिंग आणि प्रचंड चर्चेत आलेले IRS अधिकारी समीर वानखेडे हे देखील महाराष्ट्र विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचं बोललं जातंय. त्यांचा पक्ष आणि मतदारसंघ सुद्धा ठरलाय. पण काही अडचणी आहेत ज्या त्यांना या निवडणुकीपासून दूर लोटू शकतात. त्या अडचणी काय आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (a big problem for irs officer sameer wankhede in contesting maharashtra assembly elections what actually happened)

हे वाचलं का?

समीर वानखेडे हे कोणत्या पक्षाकडून लढणार? मतदारसंघ कोणता आणि गणित कसं असेल याबाबतही नेमकी माहिती समजून घेऊया.

समीर वानखेडे 'या' पक्षाकडून लढवणार निवडणूक?

शाहरुख खानसह अनेक सेलिब्रेटींना घाम फोडणारे शिवाय नवाब मलिकांसह अनेक नेत्यांना नडणारे समीर वानखेडे देशभरात चर्चेत आले होते. याशिवाय मिका सिंहला मुंबई एअरपोर्टवर परदेशी करंन्सीसह पकडणं असो किंवा अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापे टाकणे असो, किंवा बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणं बाहेर काढण्याच्या कारवायांमागे समीर वानखेडे यांचं नेतृत्त्व होतं.

हे ही वाचा>> Baba Siddique Case : "बाबा सिद्दीकी काय भला माणूस नव्हता...", दिल्लीत पकडलेला शार्प शूटर काय म्हणाला?

आता वानखेडे राजकारण एन्ट्री करताहेत हे जवळपास फिक्स झालं आहे. शिवाय ते काही दिवसांवर आलेली विधानसभा निवडणूक देखील लढवणार आहेत.  ते महायुतीकडूनही निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. वानखेडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. 

शिंदे गटात प्रवेश घेऊन वानखेडे हे लगेच विधानसभा लढवणार आहेत. त्यांचा मतदारसंघ हा मुंबईतला असणार आहे. हा मतदारसंघ म्हणजे वर्षा गायकवाडांचा गड असलेला धारावी मतदारसंघ. धारावीमधून काँग्रेसकडून वर्षा गायकवाड  आमदार होत्या, ज्या आता खासदार झाल्या आहेत. या भागात काँग्रेसचं वर्चस्व असलं तरी शिवसेनेचा देखील प्रभाव आहे. त्यामुळंच वानखेडे शिवसेनेत जाणार असल्याचं बोललं जातंय. त्यांच्याविरोधात वर्षा गायकवाडांच्या भगिनी ज्योती गायकवाड निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. 

धारावी हा मतदारसंघ राखीव आहे. समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा देखील चर्चेत आला होता. वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारवर नोकरी मिळवण्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. यानंतर हे प्रकरण कोर्टात देखील गेलं होतं. मात्र जात पडताळणी समितीनं वानखेडेंचं प्रमाणपत्र वैध ठरवलं होतं.

हे ही वाचा>> Ladki Bahin Free Gas Cylinder: लाडक्या बहिणींनो! फ्री मध्ये मिळणार 3 गॅस सिलेंडर! 'असा' करा अर्ज

समीर वानखेडे हे अनुसूचित जातीतील आणि मुस्लिम असल्याने त्यांना इथं फायदा होईल असं बोललं जातंय. वानखेडेंमुळे महायुतीपासून दुरावलेला मुस्लिम मतदार पुन्हा त्यांच्याकडे वळेल असं बोललं जातंय. शिवाय वानखेडे यांची अधिकारी म्हणून धडाकेबाज कामगिरीचा देखील त्यांना फायदा होऊ शकतो. 

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत धारावी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अनिल देसाईंना आघाडी मिळाली होती. त्यामुळं शिंदेंनी वानखेडेंना तिकीट दिलं तरी ही आघाडी तोडण्याचं चॅलेंज मोठं असणार आहे.  .
आता हे सगळं होऊनही समीर वानखेडेंना निवडणूक लढवणं सोपं नसणार आहे. कारण या सगळ्यासाठी त्यांना आधी आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. शिवाय हा राजीनामा केंद्र सरकारच्या गृह विभागाला स्वीकारावा लागणार आहे. त्यानंतर राजकारणातील प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.  

ड्रग्ज केसमध्ये आर्यन खानला सोडण्यासाठी वानखेडे यांनी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचाही आरोप झाला होता. यामुळे एनसीबीची नाचक्की झाली होती. त्यामुळे समीर वानखेडे यांची एनसीबीच्या संचालकपदावरुन उचलबांगडी झाली होती. या सगळ्या आरोपांची प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे, असं प्रतिज्ञापत्र एनसीबीने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. 

नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 दरम्यान समीर वानखेडे यांना चौकशीकरता 8 समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, आठ वेळा समीर वानखेडे चौकशीसाठी हजर झाले नव्हते. सीबीआयनं देखील समीर वानखेडे यांच्याविरोधात FIR केला आहे. त्यासंदर्भात देखील चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. या चौकशीमुळं आणि आरोपांमुळं केंद्र सरकार त्यांना रिलिव्ह करेल का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

मात्र केंद्रात भाजपचं सरकार असल्यानं एकनाथ शिंदे वानखेडेंसाठी प्रयत्न करु शकतात, अशी चर्चा आहे. वानखेडे हे विधानसभेच्यामैदानात उतरण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना यात कितपत यश मिळतंय हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

    follow whatsapp