Supriya Sule : "शरद पवार कोण आहेत, हे एकदा ठरवा", सुळेंचा शाहांवर हल्ला

मुंबई तक

22 Jul 2024 (अपडेटेड: 22 Jul 2024, 11:24 AM)

Supriya Sule on Amit Shah Statement : शरद पवारांना भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे शिरोमणी असा उल्लेख करणाऱ्या अमित शाहांना सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. 

follow google news

Supriya Sule Amit Shah Sharad Pawra : 'भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा म्होरक्या भारतीय राजकारणात कुणी असेल, तर ते शरद पवार आहेत', असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात बोलताना केले. शाहांनी केलेल्या विधानाला खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले. मोदी सरकारच्या काळात देण्यात आलेल्या पद्म विभूषण पुरस्काराचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंनी भाजपला उलट सवाल केला. (Supriya Sule Reaction on Amit Shah's statement on Sharad pawar)

हे वाचलं का?

सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांना काय उत्तर दिले?

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रात हेडलाईन करायची असेल, तर उद्धवजी आणि शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. एका सशक्त लोकशाहीमध्ये आमच्या विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे. विरोधक पण दिलदार असला पाहिजे."

हेही वाचा >> ठाकरे-पवारांवर शाहांचा सर्वात मोठा हल्ला! भाजपची विधानसभेची ‘लाईन’ ठरली? 

"आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत. आम्ही दडपशाहीवाले नाहीत. त्याच्यामुळे तो अधिकार अमित शाहांना आहे. शेवटी ते आमचे विरोधक आहेत. ते आमचे गुणगान गाणार नाहीत. आमच्यावर टीकाच करणार आहेत", असा टोला सुप्रिया सुळेंनी भाजपला लगावला.  

शाहांच्या विधानावर सुळे म्हणाल्या, मला हास्यास्पद वाटलं

"अमित शाहांनी टीका केली, त्याबद्दल मला थोडं आश्चर्य वाटलं आणि हास्यास्पदही वाटलं. कारण असं की, आधी ते मोदी सरकार होतं. आता ते एनडीए सरकार आहे. पण, जेव्हा मोदी सरकार होतं, त्याच मोदी सरकारने शरद पवारांचा पद्म विभूषण देऊन गेली सहा दशकं, देशाची आणि महाराष्ट्राची उत्तम सेवा केल्याबद्दल सन्मान केला. त्यामुळे शरद पवार कोण आहेत, हे एकदा भाजपने ठरवावं", असा उलट सवाल सुप्रिया सुळे यांनी भाजपला केला आहे.

हेही वाचा >> ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनचा घटस्फोट होणार? 

"कदाचित अमित शाहांना त्याचा विसर पडला असेल आणि ते ज्या वास्तूमध्ये बोलत होते, ती वास्तूही शरद पवार मुख्यमंत्री असतानाच बालेवाडी झालेली आहे. कदाचित त्यांना ते कुणी सांगितले नसेल", असा चिमटा सुप्रिया सुळेंनी काढला. 

"ते ज्यांच्यावर आरोप करतात, ते मंत्री-मुख्यमंत्री होतात"

"दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेटा. जेव्हा जेव्हा अमित शाह आणि त्यांचे वरिष्ठ नेते, महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते हे जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप करतात. तेव्हा ९० टक्के लोकं ज्यांच्यावर ते आरोप करतात, ते भाजपचे मित्रपक्ष, मंत्री, मुख्यमंत्री किंवा सहकारी होतात. कालचंच उदाहरण बघा. अमित शाह भाषण करत होते. त्यांच्या मागेच अशोक चव्हाण बसलेले होते", असे सांगत सुप्रिया सुळेंनी अमित शाहांना घेरण्याचा प्रयत्न केला. 

    follow whatsapp