BJP ने अशोक चव्हाणांवर केलेल्या जहरी टीकेची 'ही' पानं कशी पुसणार?

मुंबई तक

• 10:26 PM • 13 Feb 2024

Ashok Chavan: अशोक चव्हाण यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, याआधी भाजप नेते आणि अशोक चव्हाण यांनी एकमेकांवर जहरी टीका केली होती. ज्याचे व्हिडीओ आणि ट्वीट हे आता व्हायरल होत आहेत.

follow google news

Ashok Chavan and BJP Criticism goes viral: मुंबई: काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये अगदी काल-परवापर्यंत सहभागी झालेले आणि भाजपविरोधात मोर्चा उघडणारे अशोक चव्हाण आता हेच स्वत: भाजपमध्ये गेल्याने भल्या-भल्या नेत्यांना धक्का बसला आहे. (how will bjp erase the poisonous criticism about ashok chavan from these pages)

हे वाचलं का?

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'कालपर्यंत सोबत होते, त्यांच्या मनातलं कळलंच नाही, धक्का बसला.' तर बाळासाहेब थोरात म्हणाले, 'आम्ही आज ११ वाजता जागावाटप आणि बाकीच्या गोष्टींवर बोलणार होतो.' तर अनिल देशमुख म्हणाले, 'खासदारकीच्या तिकीट वाटपासाठी जेव्हा आम्ही तिन्ही पक्ष बसलो त्यात अशोक चव्हाण सुद्धा होते. काँग्रेसला कोणत्या जागेवर आपले उमेदवार उभे करायचे आहेत त्यासाठीच्या चर्चेत ते सुद्धा होते. अशोक चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, अशा पद्धतीने महाविकास आघाडीला ते सोडून जाऊ शकणार नाही याची मला खात्री आहे, असंही देशमुखांनी म्हटलं, पण अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडलंय ही वास्तविकता आहे.'  

आता चव्हाणांनी काँग्रेस सोडून भाजपमधून आपला पुढचा प्रवास सुरू केला आहे. असं असलं तरीही आता त्यांच्यावर भाजपनं आधी केलेल्या टीकेचे स्क्रिनशॉट्स आणि व्हिडीओ जोरात व्हायरल होऊ लागले आहेत. शिवाय त्यांनी भाजपवर केलेले ट्वीट्स देखील कार्यकर्ते उकरुन काढत आहेत. 

एकूणच अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानं आणि भाजप प्रवेशाने सोशल मीडिया ओसंडून वाहतो आहे. तिथं नेमकं काय सुरुय आणि भाजपनं त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे सोशल वॉर उफाळून का आलंय हे पाहूयात...
 
महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेते अशोक चव्हाणांनी काँग्रेसला राम राम ठोकलाय. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा तर दिलाच शिवाय त्यांनी आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. जो  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला देखील आहे. काँग्रेस सोडल्यानंतर ते आता भाजपमध्ये गेले आहेत.  त्यामुळे भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारीही दिली जाऊ शकते, असा अंदाज आहे. 

अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन भाजपच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे आणि याचं मुख्य कारण मोदी सरकारनं लोकसभा अधिवेशनादरम्यान काढलेली एक श्वेतपत्रिका असल्याचं बोललं जात आहे. निर्मला सीतारामण यांनी यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचारासंदर्भात एक श्वेतपत्रिका लोकसभेत ठेवली होती. यात चव्हाण यांच्या आदर्श प्रकरण तसेच इतर अनियमित कारभाराचा पर्दाफाश करण्यात आला होता. हा अशोक चव्हाण यांना एक इशारा होता, अशी चर्चा आहे.  

अशोक चव्हाणांवर भाजपने काय केलेली टीका?

पंतप्रधान मोदी यांनी नांदेडमध्ये जाऊन आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करत टीका केली होती. तर फडणवीसांनी चव्हाण लीडर नसून डीलर आहेत, अशी जहरी टीका केलेली. हे झालं भाजपनं चव्हाणांवर केलेल्या टीका. 

दुसरीकडे चव्हाणांनी देखील भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलेले आपण पाहिलंय. 'नरेंद्र मोदी फेकू आहेत, हुकुमशाहाकडे सत्ता देऊ नका.' अशा कैक जहरी टीका चव्हाणांनी थेट मोदींवर केल्या आहेत, गुगल केल्या तर अशा कित्येक बातम्या आपल्याला दिसतील. अनेक ट्वीट्सही त्यांच्या टाईमलाईनवर आहेत, ज्यात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

जननायक आ रहे है म्हणत काहीच दिवसांपूर्वी राहुल गांधींचं एक पोस्टर आपल्या गाडीवर लावल्याचा व्हिडीओ त्यांच्या टाईमलाईनवर अजूनही दिसतोय. असो राजकारणात हे काही पहिल्यांदाच झालेलं नाही, आधीही बऱ्याचदा असं घडलंय आणि भविष्यात असं होणार नाही याची शाश्वती आपण देऊ शकत नाहीत. यामध्ये कार्यकर्ते नावाच्या माणसांची मात्र फरफट होताना दिसते आहे. 

    follow whatsapp