Pooja Khedkar: वाशिममधून निघालेली IAS Puja Khedkar कुठे झाली गायब?

IAS पूजा खेडकर ही सध्या नॉट रिचेबल आहे. कारवाईच्या भीतीने पूजा खेडकर यूपीएससीसमोर हजर होत नसल्याचं सध्या बोललं जात आहे.

मुंबई तक

24 Jul 2024 (अपडेटेड: 24 Jul 2024, 10:13 PM)

follow google news

पुणे: IAS पूजा खेडकर ही आता अचानक गायब झाली आहे. वाशिमहून पुण्यासाठी निघालेली पूजा ही सध्या नॉट रिचेबल आहे. त्यामुळे या प्रकरणी सध्या उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

खोटी कागदपत्रं सादर करून दिव्यांग आणि ओबीसी आरक्षण याचा फायदा घेत  पूजाने IAS पद मिळवलं असल्याचा तिच्यावर आरोप आहे. ज्याप्रकरणी यूपीएससीने तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

दुसरीकडे पूजाची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यावर देखील कारवाई केली जात आहे. एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून धमकवल्या प्रकरणी मनोरमा खेडकर सध्या तुरुंगात आहेत. 

असं असताना आता अचानक पूजा खेडकर गायब असल्याची माहिती समोर आली आहे. वाशिमधून रवाना झाल्यानंतर पूजा खेडकर नक्की कुठे गेली? याची माहिती समोर न आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 
 

    follow whatsapp