Sanjay Raut Prakash Ambedkar : (प्रविण ठाकरे, नाशिक) वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संजय राऊत हे खोटी माहिती माध्यमांना देतात असे मोठे विधान केले. आंबेडकरांनी केलेल्या विधानावर संजय राऊतांनी बोलताना उलट सवाल केला आहे. राऊतांनी अप्रत्यक्षपणे आंबेडकरांवर टीकेचे बाण डागले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "जागावाटपाच्या चर्चा महाविकास आघाडी समाज माध्यमांवर करत नाही. ट्विटर, फेसबुक किंवा व्हाट्सअपवर आघाडी किंवा तिचे घटक पक्ष अशा प्रकारची चर्चा करत नाही. जे आघाडीबद्दल गंभीर असतात, जे राज्याची आणि देशातील प्रश्नाविषयी जे गांभीर्याने राजकारण करू इच्छितात... त्यांनी आघाडीचा धर्म म्हणून समाजमाध्यन्मावर व्यक्त होणं बरोबर नसतं", असे म्हणत संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना चिमटा काढला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> मनसेला पुण्यात मोठा हादरा.. राज ठाकरेंना दंडवत घालून वसंत मोरेंनी सोडली MNS
"आमच्यापैकी कुणीही, जरी आमची चर्चा सुरू असली, तरी आम्ही कुणीही समाजमाध्यमांवर व्यक्त झालेलो नाही. मी सांगू इच्छितो की, राष्ट्रवादी, काग्रेस आणि शिवसेना यांच्यात जागावाटपासंदर्भात बोलणी संपलेली आहे. कोणतीही चर्चा आता शिल्लक नाही. फक्त त्या संदर्भातील घोषणा कधी करायच्या, हे आम्ही ठरवू", असे संजय राऊत म्हणाले.
"वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यांनी दिलेल्या यादीतील उत्तम चार जागा आम्ही त्यांना देऊ इच्छितो", असे संजय राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा >> शिंदे-पवार सोबत तरीही भाजपचं मिशन 45 धोक्यात! मविआचं काय?
संजय राऊत हे माध्यमांशी खोटं बोलतात, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "मी काय खोटे बोललो ते स्पष्ट करावे. त्यांनी जी यादी दिली, त्यातील चार जागा... त्या बैठकीला शरद पवार हेही उपस्थित होते. बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे होते. मी सोडून द्या, मी खोटे बोलतो. पण, चार जागांचा प्रस्ताव आम्ही दिलाय की नाही? यात काय खोटे बोलण्याचा प्रश्न आहे. आम्ही काय समाजमाध्यमांवर जात नाही. प्रकाश आंबेडकर आमचे मित्र आहेत, त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. त्यांची साथ आम्हाला हवी आहे. खोटे बोलण्याचा प्रश्न काय?", अशी भूमिका राऊतांनी मांडली आहे.
ADVERTISEMENT