Sharad Pawar On Nilesh Lanke English Speech : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या इंग्रजीचे शरद पवार यांच्याकडून पुन्हा एकदा कौतुक करण्यात आले आहे. ''मला काळजी होती, पण लंकेंची गाडी धाड धाड इंग्रजीत सुटली'', असे म्हणत अकोल्याच्या सभेतून शरद पवारांनी निलेश लंके (Nilesh Lanke) यांचं कौतुक करत सुजय विखेंवर (Sujay vikhe Patil) निशाणा साधला.नेमकं शरद पवार काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात. (sharad pawar again praised nilesh lanke english oath parliament and criticize sujay vikhe patil akola sabha)
ADVERTISEMENT
अकोल्यातील शेतकरी मेळाव्यातून बोलताना शरद पवार म्हणाले की, ''मी ठरवलंय माणसं साधी घ्यायची. आता बघा निलेश लंके निवडणुकीला उभे राहिले, त्यांच्या विरोधात एक मोठे नेते होते, असा टोला शरद पवारांनी सुजय विखेंना लगावला. त्या मोठ्या नेत्याने जाहीर केलं, हा गृहस्थ पारनेरमध्ये राहणार, त्याला इंग्रजी येत नाही. हा तिथे जाऊन काय करणार? पण पार्लमेंटमध्ये इंग्रजीचं यावं लागतं असं नाही. पार्लमेंटमध्ये हिंदीत बोलता येतं, मराठी बोलता येतं, तुमच्या मातृभाषेत बोलता येतं', असे शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा : Wagh Nakh : वाघनखं खरी की खोटी.. सरकार आणि इतिहास संशोधकाचा दावा काय?
''निलेश लंके गेले पार्लमेंटला...मलाही काळजी होती. आमचा गडी पार्लमेंटला जातोय, काय बोलतोय माहित नाही? शपथ घ्यायला उभा राहिला आणि धाड धाड इंग्रजी, गाडी जी सुटली ती...सगळं पार्लमेंट बघायला लागला कोण हा गडी आला, थांबायला तयार नाही आणि भाषण काय केलं. माझ्या शेतकऱ्याची जपवणूक इथे होत नसेल तर इथलं काम मी चालूनच देणार नाही. त्यांनी जी मांडणी केली ती कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची त्या ठिकाणी केली'', अशा शब्दात शरद पवारांनी निलेश लंकेचं कोतुक केलं.
दरम्यान सुजय विखेंनी, ‘मी जेवढे इंग्रजी बोललो तेवढे समोरच्या उमेदवाराने किमान पाठ करून सभेत बोलून दाखवावे. तसे झाले तर मी माझा उमेदवारी अर्जच भरणार नाही.’ असे आव्हान दिले होते. पण निलेश लंके यांनी हे आव्हान स्वीकारले आणि संसदेत इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. त्यानंतर आता शरद पवार दुसऱ्यांदा निलेश लंकेंचे तोंडभरून कौतुक केले आहे.
ADVERTISEMENT