Sharad Pawar : वळसे पाटलांविरुद्ध पवारांनी थोपटले दंड! बापाचं नाव घेत केला 'वार'

Sharad Pawar Speech : मंचर येथे झालेल्या सभेत शरद पवार यांनी अजित पवार गटातील दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्ला चढवला.

मुंबई तक

• 11:39 AM • 22 Feb 2024

follow google news

Sharad Pawar Speech : दत्तात्रय पाटील यांचा उल्लेख करत शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर पहिला हल्ला केला. "दत्तात्रय पाटील यांच्या ठायी जी निष्ठा होती, त्यातील पाच टक्के निष्ठा सुद्धा दिलीप वळसे पाटील यांच्यात नाही”, असा घणाघाती हल्ला करत शरद पवारांनी मतदारांना वळसे पाटलांना पाडण्याचे आवाहन केले. (Sharad Pawar Attacks on Dilip Walse Patil)

हे वाचलं का?

मंचर येथे झालेल्या सभेत शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांच्या निष्ठेवर बोट ठेवलं. शरद पवार म्हणाले, "दत्तात्रय वळसे पाटील यांनी माझ्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. आंबेगाव तालुक्याने दत्तात्रय वळसे पाटील सारखे नेते दिले. त्यांच्या वारसदारांना (दिलीप वळसे पाटील) आम्ही खूप काही दिलं."

शरद पवार पुढे म्हणाले, "विधानसभेचं अध्यक्ष केले, मंत्रिपदे दिली, देशाच्या साखर उद्योगाचे अध्यक्षपद दिले, अनेक संस्थांवर काम करण्याची संधी दिली. एवढे दिल्यानंतरही दत्तात्रय पाटील यांच्या ठायी जी निष्ठा होती, त्यातील पाच टक्के निष्ठा सुद्धा दिलीप वळसे पाटील यांच्यात नाही”, असा घणाघात शरद पवारांनी मंचर येथील सभेत वळसे पाटलांवर केला. (शरद पवारांचे संपूर्ण भाषण बघण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा)

    follow whatsapp