Sindhudurga: राजकोटवर राडा, राणेंच्या बालेकिल्ल्यात भर पावसात ठाकरेंचं तडाखेबदं भाषण!

मुंबई तक

• 05:35 PM • 28 Aug 2024

राजकोट येथे गेलेल्या आदित्य ठाकरे आणि समर्थकांची राणेंच्या समर्थकांसोबत बराच राडा झाला. ज्यानंतर मालवणमध्ये केलेल्या भाषणात आदित्य ठाकरेंनी राणेंवर बरीच टीका केली.

follow google news

सिंधुदुर्ग: छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळल्याचं वृत्त समोर येताच त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सिंधुदुर्गात आज (28 ऑगस्ट) मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचवेळी महाविकास आघाडीतील नेते राजकोट किल्ल्याची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले असताना तिथे राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. (sindhudurga commotion on rajkot aaditya thackerays fiery speech in heavy rain in malavan criticized rane)

हे वाचलं का?

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे आदित्य ठाकरे राजकोटवर पोहचण्याच्या काही मिनिटं आधी तिथे पोहचले होते. ज्यानंतर जवळजवळ तासभर राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा सुरू होता.

पण याच राड्यानंतर आदित्य ठाकरेंनी मालवणमध्ये जोरदार भाषण दिलं. एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असतानाही आदित्य ठाकरेंनी पुतळ्याच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर तुफान हल्ला चढवला. 

    follow whatsapp