Maharashtra Vidhan Parishad ELection 2024 : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ११ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत महायुतीने पुन्हा आपले वर्चस्व दाखवून दिले. महाविकास आघाडीतील आमदारांना गळाला लावत महायुतीने ९ उमेदवार निवडून आणले. यात सर्वाधिक मते काँग्रेसची फुटली. त्यात आता भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी एक राजकीय बॉम्ब टाकला आहे. महायुतीच्या उमेदवाराला ठाकरेंच्या शिवसेनेचीही दोन मते मिळाल्याचा दावा अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी विधान परिषद निवडणूक निकालाचे विश्लेषण काय केले आणि त्यांनी कोणते स्फोटक दावे केलेत, हे समजून घेण्यासाठी पहा व्हिडीओ...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT