Dada Bhuse Mahendra Thorve Fight : शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे आणि शिवसेनेचेच कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळ लॉबीमध्ये वाद झाला. या वादाबद्दल आमदार थोरवे यांनी सविस्तर माहिती दिली. (What Did Happened between dada bhuse and mahendra thorve)
ADVERTISEMENT
महेंद्र थोरवे विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना झालेल्या प्रकाराबद्दल सविस्त माहिती दिली. ते म्हणाले, "मोठ्या आवाजात ते माझ्याशी बोलले की, तुम्ही अशा पद्धतीने मला प्रश्न विचारू शकत नाही. अरे मी आमदार आहे. माझ्या मतदारसंघातील काम आहे. मी तुम्हाला प्रश्न नाही विचारणार, तर प्रश्न विचारणार कुणाला? मुख्यमंत्री सक्षमपणे काम करत असताना मी त्यांना सांगितल्यानंतर एका क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी फोन करून सांगितलं की, दादा तुम्ही हे काम बोर्ड मीटिंगला घ्या. थोरवेंनी तुम्हाला सांगितलेलं."
दादा भुसेंनी असं करू नये -थोरवे
"तरी सुद्धा जाणिवपूर्वक ते काम घेतलं गेलं नाही. आणि म्हणून आमच्यात त्या ठिकाणी बाचाबाची झाली. जाणिवपूर्वक त्यांनी ते काम का केलं नाही, याबद्दल मला माहिती नाही. मला माहिती नाही, त्यांच्या मनात काय चाललेलं असतं ते. पण, दादा भुसे निगेटिव्ह पद्धतीने विचार करतात, प्रत्येक आमदाराच्या बाबतीत. असं त्यांनी वागू नये असं मला वाटतं", असे आरोप थोरवे यांनी भुसेंवर केले.
"माझ्या मतदारसंघात सर्वात जास्त निधी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे सर्वात चांगलं काम माझ्या मतदारसंघात झालेलं आहे. मुख्यमंत्री ७ जानेवारीला कर्जतमध्ये आले होते. पण, हे एक जे काम होतं, ते दादा भुसेंना सांगितलेलं पहिलंच काम होतं. मागे त्यांच्याकडे दुसरं खातं होतं. त्या खात्याचे एक काम सांगितलं होतं, तेही त्यांनी तेव्हा केलं नाही आणि आता हे खातं असताना जे काम मी त्यांना सांगितलेलं होतं ते काम त्यांनी केलेलं नाही. म्हणून आमच्या तू-तू, मैं-मैं झाली", असे आमदार थोरवे यांनी सांगितले.
"माझ्या मतदारसंघातीस कामाबद्दल मी विचारत होतो. अनेक दिवसांपासून मी त्याबद्दल विचारत होतो. ते थोडसं उद्धटपणे माझ्याशी बोलले. दादा भुसेंचा आवाज वाढला, मग माझा आवाज वाढला. अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आमदार आपल्या कामासाठी मंत्र्यांना विचारतात, तसं मी विचारलं. आमच्यात वाद झाला, पण आता आमच्यातला वाद संपलाय", अशी माहिती थोरवे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिली.
ADVERTISEMENT
