आतापर्यंत तुम्ही अनेक महागडे शूज पाहिले असतील. साधारण 5000? 15000? किंवा 20000? अशी बुटांची किंमत असल्याचं आपण ऐकलंय. पण आज आम्ही तुम्हाला ज्या बुटांबद्दल सांगणार आहोत, त्यांची किंमत हे हजार किंवा लाखांमध्ये नाही तर कोटींमध्ये आहे. होय.. एक अशी बुटांची जोडी आहे की, त्याची किंमत ही तब्बल 18 कोटी रुपये आहे. आता ही किंमत समजल्यावर तुम्हाला देखील याचे फिचर्स जाणून घेण्याविषयी नकीच उत्सुकता वाटू लागली असेल. तसंच हे देखील समजलं असेल की हे सामान्य शूज नाहीत. (18 crore rupees shoes red black color know what are such qualities)
ADVERTISEMENT
मग आता या बुटांमध्ये असे काय विशेष आहे की ते 18 कोटींना विकले जात आहेत? खरं तर हे बूट दिसण्यात अगदी सामान्य आहेत. पण लाल आणि काळ्या रंगाचे हे बूट अतिशय सुरक्षितपणे ठेवण्यात आले आहेत.
अधिक वाचा – सुप्रसिद्ध संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टींना कोल्हापुरात भर रस्त्यात चपलेने मारहाण, काय घडलं?
तब्बल 18 कोटींचे बूट
या बुटांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे बूट महान बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डन याने कधी काळी परिधान केले होते. मायकल जॉर्डन हा बास्केटबॉलच्या जगातील एक महान खेळाडू मानला जातो. 1998 मध्ये त्याने एनबीए फायनल्समध्ये हे बूट परिधान केले होते. जे नुकतेच लिलावासाठी ठेवण्यात आले होते. याच लिलावात त्यांची किंमत ही तब्बल 2.2 दशलक्ष डॉलर्सपर्यंत (18 कोटी) पोहोचली. ‘त्याने 1998 च्या NBA फायनलच्या आधी हे शूज घातले होते, आणि त्यांनी विजय मिळवला होता हे तुम्हाला माहीत आहे,’ अशी प्रतिक्रिया सोथेबीच्या स्ट्रीटवेअरचे प्रमुख ब्रहम वॉचर यांनी दिली आहे.
अधिक वाचा – लग्नाला 10 वर्ष, 3 मुलं… पती-पत्नीची DNA टेस्ट झाली अन् पायाखालची सरकली जमीन…
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, वॉचर्स यांनी पुढे सांगितले की, ‘त्याने 37 पॉईंट स्कोअर केले होते. त्याच सामन्यात जॉर्डनने जे बूट घातले होते त्या बुटांची स्थिती खूप चांगली आहे. यावर जॉर्डनची चांदीची स्वाक्षरीही आहे. ही एक अद्भुत गोष्ट आहे. आता सोशल मीडियावरही लोक या बुटांबद्दल खूप चर्चा करत आहेत. लोक या बुटांचे आणि तसेच जॉर्डनचे फोटोही शेअर करत आहेत. या बुटांची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते जॉर्डनने परिधान केले होते त्यामुळेच आज त्यांची किंमत ही कोट्यवधींमध्ये पोहचले आहे.
ADVERTISEMENT