देशात Taliban ची सत्ता, T-20 World Cup मध्ये सहभागी होणार अफगाणिस्तानचा संघ

मुंबई तक

• 12:25 PM • 16 Aug 2021

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ सहभागी होणार की नाही यावरुन बऱ्याच चर्चा सुरु होत्या. परंतू या चर्चांना पूर्णविराम देत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ टी-२० विश्वचषकात सहभागी होईल असं जाहीर केलं आहे. ऑक्टोबर महिन्यात युएईत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. अफगाणिस्तानच्या संघाचे मीडिया मॅनेजर हिकमत हसन यांनी ANI शी बोलत असताना […]

Mumbaitak
follow google news

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ सहभागी होणार की नाही यावरुन बऱ्याच चर्चा सुरु होत्या. परंतू या चर्चांना पूर्णविराम देत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ टी-२० विश्वचषकात सहभागी होईल असं जाहीर केलं आहे. ऑक्टोबर महिन्यात युएईत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

हे वाचलं का?

अफगाणिस्तानच्या संघाचे मीडिया मॅनेजर हिकमत हसन यांनी ANI शी बोलत असताना संघाच्या सहभागाबद्दल माहिती दिली आहे.

होय, आम्ही टी-२० विश्वचषकात सहभागी होणार आहोत. यासाठी तयारी सुरु झाली असून पुढच्या काही दिवसांमध्ये जे खेळाडू देशात आहेत त्यांना काबुलमध्ये सरावासाठी आणलं जाईल. ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिरंगी मालिकेसाठी आम्ही जागा शोधत आहोत. श्रीलंका, मलेशिया यासारख्या देशांशी आमची चर्चा सुरु आहे. त्यामुळे हा प्लान कसा आखला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हिकमत हसन – मीडिया मॅनेजर, अफगाणिस्तान क्रिकेट टीम

अफगाणिस्तान-वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिरंगी मालिका युएईत होणार होती. परंतू आयपीएलचे उर्वरित सामने युएईत खेळवण्यात येणार असल्यामुळे आता ही तिरंगी मालिका श्रीलंकेत खेळवली जाणार आहे. याचसोबत १ ते ५ सप्टेंबरदरम्यान अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातली नियोजीत मालिकाही वेळापत्रकानुसार खेळवली जाईल असं संघाच्या मीडिया मॅनेजरने स्पष्ट केलंय.

सध्याच्या बिघडलेल्या वातावरणात क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना सर्वोतोपरीने मदत करण्यासाठी कटीबद्ध आहे. काबूलमध्ये परिस्थिती अजून नियंत्रणात आहे. आम्ही सर्वजण ऑफिसमध्ये आलो आहोत, त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही अशी माहिती हकमत हसन यांनी दिली. टी-२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा समावेश दुसऱ्या गटात करण्यात आला असून त्यांना भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि आणखी दोन देशांचा सामना करायचा आहे.

Rashid Khan चा परिवार अडकला अफगाणिस्तानात, Taliban चा राजधानी काबुलवर ताबा

    follow whatsapp