टोकियो ऑलिम्पिक्समध्ये नीरज चोप्राने भाला फेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं आहे आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यानंतर विविध राजकारणी, दिग्गज यांच्याकडून नीरजचं अभिनंदन केलं जातंच आहे तसंच बॉलिवूडही नीरज चोप्रावर फिदा झालं आहे. सगळ्यांनी ट्विटर नीरज चोप्राबद्दल गर्व व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
वाचा कुणी कुणी काय प्रतिक्रिया दिली आहे?
मधुर भांडारकर
प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी, वा! गोल्डन थ्रो केलास नीरज चोप्रा. ऐतिहासिक क्षण दाखवलास तुझ्या कामगिरीसाठी तुला शुभेच्छा. भारताला तुझा प्रचंड अभिमान वाटतो असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
अजय देवगण
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण यानेही नीरजला शुभेच्छा दिल्या आहेत. टोकियामध्ये केलेली तुझी कामगिरी अतुलनीय आहे. तुझ्या आई वडिलांना जसा तुझा अभिमान वाटतो तसाच संपूर्ण देशालाही वाटतो आहे. मी तुला सांगू शकत नाही मलाही किती आनंद झाला आहे. तुझ्या कामगिरीसाठी शुभेच्छा
सनी देओल
काय जबरदस्त खेळ नीरज भारताला तुझ्याबद्दल अभिमान वाटतो आणि मलाही.
स्वरा भास्कर
शेहनाज गिल
Wow its Gold खूप खूप शुभेच्छा. इतिहास घडवणाऱ्या नीरज चोप्राचं अभिनंदन
चित्रांगदा सिंग
नीरजने गोल्ड मेडल घरी आणलं. भारतीय अॅथलेटिक्सच्या इतिहात हा दिवस तुझ्यासाठी कायम लक्षात ठेवला जाईल. तुझा आम्हाला अभिमान वाटतो.
अनुष्का शर्मा
आणि..सुवर्ण पदक घरी आलं. सगळ्या देशाला तुझा अभिमान आहे नीरज. खूप खूप अभिनंदन नीरज चोप्रा.
करीना कपूर
अभिनंदन नीरज चोप्रा
अभिषेक बच्चन
वा! नीरज इतिहास घडवलास. नीरज चोप्रा अॅथलेटिक्समधल्या गोल्ड मेडलसाठी तुझं खूप खूप अभिनंदन
रणवीर सिंग
भारतमाता की जय ऐतिहासिक क्षण दाखवणाऱ्या आणि गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरजचं अभिनंदन
विकी कौशल
आणि भारताला सुवर्णपदक मिळालं. नीरज चोप्रा तू सगळ्या देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी केली आहेस अभिनंदन
पात्रता फेरीत ८५ मी. चं अंतर पार केलेल्या नीरज चोप्राने अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात धडाकेबाज सुरुवात केली. ८७.०३ मी. लांब भाला फेकत नीरजने पहिल्या राऊंडनंतर आघाडी घेतली. नीरज चोप्रासाठी आव्हान ठरु शकणाऱ्या जर्मनीच्या ज्युलिअन वेबर आणि जोहान्स वेटेर यांनीही अनुक्रमे ८५.३० आणि ८२.५२. लांब भाला फेकला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पहिल्या प्रयत्नात ८२ मी. चं अंतर पार करत चौथं स्थान पटकावलं. परंतू चेक रिपब्लीकच्या जाकुबने ८३ मी. लांब भाला फेकत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र नीरजने सगळ्यांना मागे टाकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आणि इतिहास घडवला.
ADVERTISEMENT