Asian Games 2023: भारताच्या मुली काय करु शकतात, ते जर बघायचे असेल तर एशियन गेम्स 2023 म्हणजे आशियाई स्पर्धेकडे तुम्ही बघू शकता. चीनच्या (china) भूमीवर खेळल्या जाणाऱ्या आशियाई क्रीडा (asian games) स्पर्धेत भारताच्या मुलींनी (womens team india) पुन्हा एकदा तिरंग्याची शान वाढवली आहे. यावेळी तीन भारतीय मुलींनी आपल्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांनी सुवर्णपदकांवर निशाणा साधला आहे. नेमबाजीमध्ये भारताकडून मनू, ईशा आणि रिदम यांनी 25 मीटर अंतरावरून नेमबाजीमध्ये भारताचे नाव उंचावले आहे. या तीन महिलांच्या नेमबाजीतील यशामुळे महिलांच्या 25 मीटर सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकावर भारताचे नाव कोरले आहे. (asian games 2023 25m pistol womens team india won gold medal manu bhaker rhythm sangwan and esha singh)
ADVERTISEMENT
सांघिक स्पर्धेत सुवर्ण
भारताला आशियाई स्पर्धेत मिळालेले हे चौथे सुवर्ण पदक आहे. तर नेमबाजीमध्ये भारताला एकूण दोन सुवर्णपदकं मिळाली आहेत. याआधी भारताने पुरुष गटात 10 मीटरमध्ये एअर रायफलमध्ये सांघिक स्पर्धेत सुवर्णपदाकवरच निशाणा लगावला होता. तर यावेळी भारताकडून पिस्तुलमधूनही सुवर्ण पदकावर लक्ष्य केले आहे.
हे ही वाचा >> Onion Price: कांदा मोदी सरकारचा वाढवणार ताप…, दोन बैठकीत असं काय घडलं?
भारताच्या ‘सुवर्ण’ कन्या
भारताच्या मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी महिलांच्या 25 मीटर पिस्तुल सांघिक स्पर्धेत 1790 गुण मिळवले आहेत. नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या तीन मुलींमध्ये मनू भाकरने सर्वाधिक 590 गुण मिळवले आहेत. तर या सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्ण तर चीनने रौप्यपदक जिंकले आहे. तर दक्षिण कोरियाला या स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
हे ही वाचा >> उद्धव ठाकरेंची सोडली साथ, मुंबईतील ‘हे’ तीन स्थानिक नेते शिंदेंच्या सेनेत
खेळाडूंची यशाला गवसणी
25 मीटर पिस्तुल सांघिक स्पर्धेत आता सुवर्णपदक मिळाले असले तरी याआधी महिलांनी नेमबाजीमध्ये 50 मीटर राइफल थ्रीमध्ये रौप्य पदक जिंकले होते. चौथ्या दिवशी सिल्व्हर तर दुसरे पदक हे सुवर्ण होते. या स्पर्धेत आशी चौकसे, मानिनी कौशिक आणि सिफ्ट कौर या तीन महिला खेळाडूंनी भारतासाठी रौप्य जिंकले होते.
ADVERTISEMENT