आगामी टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन चौहान यांनी पत्रकार परिषदेत या संघाची घोषणा केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघात रविचंद्रन आश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांनी पुनरागमन केलं आहे.
ADVERTISEMENT
महत्वाच्या स्पर्धेसाठी बीसीसीआयने महेंद्रसिंह धोनीकडे संघाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवली आहे. धोनी या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून युएईला जाणार आहे.
असा असेल टीम इंडियाचा संपूर्ण संघ –
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा (व्हाईस कॅप्टन), लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन (दोघेही यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, राहुल चहर, रविचंद्रन आश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
स्टँडबाय वर असलेले प्लेअर – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर
१७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा यंदा युएई आणि ओमानमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचं आयोजन हे भारताबाहेर होणार असलं तरीही स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क हे बीसीसीआयकडेच राहणार आहेत. कोरोनामुळे देशात निर्माण झालेलं संभ्रमाचं वातावरण पाहता आम्ही ही स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये आयोजीत करण्यात आलेली आहे.
या स्पर्धेसाठी ४ ठिकाणं निश्चीत करण्यात आली आहेत.
१) दुबई इंटरनॅशनल स्टेडीअम
२) शेख झायेद स्टेडीअम, अबुधाबी
३) शारजाह स्टेडीअम
४) ओमान क्रिकेट अकॅडमी ग्राऊंड
स्पर्धेचा पहिला टप्पा हा ८ देशांच्या पात्रता फेरीपासून सुरुवात होईल. ओमान आणि युएई अशा दोन ठिकाणी ही पात्रता फेरी खेळवली जाईल. या पात्रता फेरीतील ४ संघ हे सुपर ८ संघासोबत पात्र ठरतील. पात्रता फेरीत खेळणाऱ्या संघाची नावं –
बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, स्कॉटलँड, नामिबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी
ADVERTISEMENT