दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा

मुंबई तक

• 09:44 AM • 27 Feb 2021

नवीन वर्षात भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. जानेवारी महिन्यात बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचं आयोजन केलं. यानंतर सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध खेळत आहे. याचसोबत बीसीसीआय सध्या विजय हजारे ट्रॉफीचंही आयोजन करत आहे. या सर्व परिस्थितीत बीसीसीआयने महिला क्रिकेटचाही शुभारंभ करायचा ठरवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या आगामी भारत दौऱ्यासाठी बीसीसीआयने महिला संघाची घोषणा […]

Mumbaitak
follow google news

नवीन वर्षात भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. जानेवारी महिन्यात बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचं आयोजन केलं. यानंतर सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध खेळत आहे. याचसोबत बीसीसीआय सध्या विजय हजारे ट्रॉफीचंही आयोजन करत आहे. या सर्व परिस्थितीत बीसीसीआयने महिला क्रिकेटचाही शुभारंभ करायचा ठरवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या आगामी भारत दौऱ्यासाठी बीसीसीआयने महिला संघाची घोषणा केली आहे.

हे वाचलं का?

अवश्य वाचा – Ind vs Eng : जसप्रीत बुमराहला भारतीय संघातून केलं रिलीज

७ ते २३ मार्च दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ भारतात ५ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता हे सर्व सामने लखनौच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलं असून महाराष्ट्राची स्मृती मंधाना टीम इंडियाची व्हाईस कॅप्टन असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यासाठी असा आहे भारताचा टी-२० संघ –

हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (व्हाईस कॅप्टन), शेफाली वर्मा, जेमायमा रॉड्रीग्ज, दिप्ती शर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, सुषमा वर्मा (विकेटकिपर), नुझरत परवीन (विकेटकिपर), आयुशी सोनी, अरुंधती रेड्डी, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, मानसी जोशी, मोनिका पटेल, सी. प्रत्युशा, सिमरन दिल बहादूर

असा असेल भारताचा वन-डे संघ –

मिताली राज (कॅप्टन), स्मृती मंधाना, जेमायमा रॉड्रीग्ज, पूनम राऊत, प्रिया पुनिया, यास्तिका भाटीया, हरमनप्रीत कौर (व्हाईस कॅप्टन), डी. हेमलता, दिप्ती शर्मा, सुषमा वर्मा (विकेटकिपर), श्वेता वर्मा (विकेटकिपर), राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, पूनम यादव, सी. प्रत्युषा, मोनिका पटेल

    follow whatsapp