Team India Home Schedule Revised: मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२४-२५ साठी मायदेशात होणाऱ्या टीम इंडियाच्या सामन्यांमध्ये फेरबदल केला आहे. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड आणि बांगलादेश विरुद्ध घरेलू मैदानात मालिका खेळणार आहे. तत्पूर्वी, बासीसीआयने टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल केल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय संघ मायदेशात बांगलादेश विरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. १९ सप्टेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर २७ नोव्हेंबरला दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ६ ऑक्टोबरला धरमशाला येथे पहिला टी-२० सामन्याची लढत होणार होती. परंतु, बीसीसीआयने पहिल्या सामन्याचं ठिकाण बदललं आहे. हिमाचल क्रिकेट असोसिएशनच्या ड्रेसिंग रुमचं नुतनीकरणाचं काम सुरु असल्यानं सामन्याचं पहिलं ठिकाण बदलण्यात आलं. आता हा सामना ग्वालियरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
ADVERTISEMENT
ग्वालियरमध्ये १४ वर्षानंतर रंगणार आंतरराष्ट्रीय सामना
ग्वालियरमध्ये १४ वर्षानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २०१० मध्ये या मैदानात शेवटचा एकदिवसीय सामना रंगला होता. या सामन्यात सचिन तेंडुलकरने द्वीशतक ठोकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यावेळी द्नीशतक ठोकणारा सचिन तेंडुलकर जगातील पहिला फलंदाज ठरला होता. बांगलादेश विरुद्ध मालिका संपल्यानंतर भारतीय संघ इग्लंड विरुद्ध मालिका खेळणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात इंग्लंड भारत दौऱ्यावर असणार आहे. त्यावेळी या दोन्ही संघांमध्ये घरेलू मैदानावर ५ सामन्यांची टी-२० मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका रंगणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यात आधी वनडे मालिका होणार असून २२ जानेवारीला या सामन्यांची सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने इंग्लंड विरोधात होणाऱ्या मालिकेच्या वेळापत्रकातही मोठा बदल केला आहे.
हे ही वाचा >> Sanjay Raut: "महाराष्ट्रात सावत्र कुणीच नाही, दिल्लीत मोदी-शाह...", संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
कोलकाता पोलिसांच्या अपिलमुळं सामन्याचं ठिकाण बदललं
बीसीसीआयने इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी वेन्यू बदललं आहे. मालिकेचा पहिला टी-२० सामना चेन्नईत २२ जानेवारीला खेळवण्यात येणार होता. परंतु, आता हा सामना कोलकातामध्ये होणार आहे. तर दुसरा टी-२० सामना कोलकातामध्ये २५ जानेवारीला रंगणार होता. परंतु, तो सामना आता चेन्नईत खेळवला जाणार आहे. सामन्याच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोलकाता पोलीस प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षेच्या कारणास्तव ऑन ड्यूटी राहणार आहेत, त्यामुळे सामन्याचं ठिकाण बदलण्यात आलं आहे.
बांगलादेशचा भारत दौरा
पहिला कसोटी सामना- चेन्नई, १९ ते २३ सप्टेंबर
दुसरा कसोटी सामना - कानपूर, २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर
पहिला टी-२० सामना - ग्वालियर, ६ ऑक्टोबर
दुसरा टी-२० सामना, दिल्ली, ९ ऑक्टोबर
तिसरा टी-२० सामना, हैदराबाद, १२ ऑक्टोबर
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : 'त्या' 27 लाख अर्जदार महिलांना बसणार धक्का, 3000 रूपये जमा होणार की नाही?
इंग्लंडचा भारत दौरा
पहिला टी-२० सामना, २२ जानेवारी, कोलकाता
दुसरा टी-२० सामना, २५ जानेवारी, चेन्नई
तिसरा टी-२० सामना, २८ जानेवारी, राजकोट
चौथा टी-२० सामना, ३१ जानेवारी, पुणे
पाचवा टी-२० सामना, २ फेब्रुवारी, मुंबई
पहिला वनडे, ६ फेब्रुवारी, नागपूर
दुसरा वनडे, ९ फेब्रुवारी, कटक
तिसरा वनडे, १२ फेब्रुवारी, अहमदाबाद
ADVERTISEMENT