IPL 2021 चा उर्वरित हंगाम युएईत खेळण्याचा निर्णय बीसीसीआयने शनिवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण बैठकीत घेतला. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बीसीसीआय युएईत ही स्पर्धा खेळवणार आहे. याचसोबत ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचं आयोजनही भारतामध्येच करण्याबद्दल या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
१ जूनला आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल निर्णय घेणार आहे. या बैठकीत बीसीसीआय आयसीसीला जून किंवा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंतचा वेळ मागणार असल्याचं कळतंय. भारतात कोरोना किंवा इतर कोणत्याही कारणामुळे स्पर्धेचं आयोजन झालं नाही तर आयसीसीने टी-२० वर्ल्डकपसाठी युएईचा अधिकृत पर्याय तयार ठेवला आहे.
“सध्याच्या घडीला भारताकडे टी-२० वर्ल्डकप आयोजनाचे हक्क आहेत. यात कोणताही बदल होणार नाही हीच भूमिका आम्ही आयसीसीकडे मांडू. जर परिस्थिती पून्हा बिघडली तरच जुन किंवा जुलै महिन्याच्या अखेरीस युएईच्या पर्यायावर विचार केला जाईल.” बीसीसीआयमधील सूत्रांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.
IPL 2021 चा उर्वरित हंगाम UAE मध्ये, BCCI कडून अधिकृत घोषणा
दरम्यान, आयपीएल स्पर्धा मध्यावधीत स्थगित झाल्यामुळे बीसीसीआयवर आर्थिक नुकसानीचं संकट कोसळलं होतं. यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला २ ते अडीच हजार कोटींचा फटका सहन करावा लागणार होता. परंतू उर्वरित हंगाम युएईला शिफ्ट करत बीसीसीआयने या नुकसानीतून स्वतःचा वाचवण्याचा मार्ग शोधला आहे.
ADVERTISEMENT