Team India : भारतात झालेल्या वर्ल्डकप 2023 (World Cup 2023) मध्ये टीम इंडियाच्या पराभवामुळे अनेकांना त्याचं दुःख झाले. भारताच्या पराभवामुळे त्यावर अनेकांनी आपला रागही व्यक्त केला आहे. अनेक जणांना भारताचा झालेला पराभव सहन न झाल्यामुळे आता सोशल मीडियावर (Social Media) मीम्सचा (Memes) पाऊस पडत आहे. तर खेळाडूंना ट्रोल करुन अनेक कमेंटसचा पाऊसही पडत आहे.
ADVERTISEMENT
शिका जय पराजयचा धडा
एकीकडे टीम इंडिया ट्रोल होत असतानाच श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीतेतील एक श्लोक व्हायरल होत आहे. व्हायरल झालेली क्लिप ही महाभारत मालिकेतील आहे. त्यामध्ये कृष्णाने अर्जुनाला विजय-पराजयाचा धडा सांगितला आहे. त्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनला सांगत आहे की, एखाद्याने पराभवामुळे तुम्ही नाराज का होता. कारण आयुष्यात अनेकदा जय-पराजयाला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या निमित्ताने तुम्हीही त्यातून एक वेगळा धडा घ्या हा प्रसंग सध्या खूप व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा >> संजय राऊतांकडून ‘कसिनो’तला फोटो ट्वीट, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
तेच तुमच्या शहाणपणाचे
ऑस्ट्रेलियाबरोबर खेळत असताना भारताचा पराभव झाला. त्यामुळे भारतातील चाहत्यांनी टीम इंडियावर अनेक मीम्स बनवून त्यांनी भारतीय संघाला उपदेशाचे डोसही पाजले आहेत. त्या प्रसंगाला धरुनच श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गगीतेतील श्लोकही त्यानिमित्ताने आता व्हायरल झाला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जीवनात जय-पराजय, सुख-दु:ख हे असतातच. मात्र तुम्ही त्याला ते कायमस्वरूपी आहे असं समजू नका, आणि तेच तुमच्या शहाणपणाचेही आहे. सुखात जास्त आनंदी होऊ नये आणि दुःखात संयम सोडू नये असं केलं तरच तुमचं जीवन सोपं होणार आहे. भगवद्गीतेतील त्याच धर्तीवर एक श्लोक आहे, ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मां कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोस्तवकर्मणि’.
विजयाची भुरळ नको
महाभारत या मालिकेतही तो प्रसंग दाखवताना सांगितले आहे की, तुम्हाला विजय हवा असला तरी, विजय तुमचाच होईल याची आवश्यकता नाही. कारण तुमचा पराभवही होऊ शकतो. मात्र तुम्हाला जर विजयाची भुरळ पडली नसेल तर तुम्हाला पराभवाचीही कधी भीती वाटणार नाही असंही सांगण्यात आले आहे.
तुम्ही तुमचा धर्म पाळा
श्रीकृष्णा अर्जुनला म्हणतो आहे की, पार्थ जर तुला असं वाटत असेल की, विजय होऊ दे अगर पराजय तरीही तू लढत आहेस. कारण विजयाच्या आनंदाचा किंवा पराभवाच्या दु:खाचा तुला प्रश्नच येत नाही. कारण जो विजयामुळे आनंदी होत नाही आणि पराभवामुळे दुःखी होत नाही तोच खरा अविचल आहे. त्यामुळे तुमचे कार्य तुम्ही करत राहा. परिणामांची इच्छा अजिबात करू नका. तुम्ही फक्त एवढच करा जे तुमच्या आवाक्यात आहे, आणि तुमचा धर्म पाळा.
ADVERTISEMENT