भारतात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती बिकट होत असताना आयपीएलच्या चौदाव्या हंगामातून काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी माघार घेतली. पण दुसरीकडे काही खेळाडू हे खडतर काळात भारताच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी बॉलर आणि आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत असलेल्या ब्रेट लीने भारताला कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
याआधी KKR च्या पॅट कमिन्सनेही आपली जबाबदारी ओळखत पंतप्रधान सहायता निधीला ५० हजार डॉलर्सची मदत केली होती. ब्रेट ली ने भारतीय आरोग्य व्यवस्थेला मदत म्हणून एक बिटकॉइन अशी मदत केली आहे. बिटकॉइन हा क्रिप्टोकरन्सीचं एक साधन आहे. एका बिटकॉइनची भारतीय रुपयांमध्ये किंमत ही अंदाजे ४१ लाखांच्या घरात आहे.
दिलदार पॅट कमिन्स ! करोनाविरुद्ध लढाईत पंतप्रधान सहायता निधीला भरघोस मदत
पॅट कमिन्सने पंतप्रधान सहायता निधीला मदत केल्यानंतर भारतीय यंत्रणांना कोरोनाविरुद्ध लढाईत मदत करण्यासाठी हळूहळू खेळाडू पुढे येताना दिसत आहे. ब्रेट ली सध्या आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत असला तरीही काही वर्षांपूर्वी तो KKR संघाचा सदस्य होता.
ADVERTISEMENT