ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या यशात मोलाचा वाटा असणाऱ्या कोचनाही बक्षीस मिळणार आहे. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने प्रशिक्षकांसाठी रोख रकमेच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. ज्यात गोल्ड मेडस मिळवणाऱ्या खेळाडूच्या कोचला १२.५ लाख, सिल्वर मेडल मिळवणाऱ्या खेळाडूच्या कोचला १० लाख तर ब्राँझ मेडल मिळवणाऱ्या खेळाडूच्या कोचला ७,५ लाखांचं बक्षीस मिळणार आहे.
ADVERTISEMENT
टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताकडून मीराबाई चानूने पदकाची कमाई केली. ४८ किलो वजनी गटात मीराबाई चानूने रौप्यपदक मिळवलं. ज्यामुळे तिचे प्रशिक्षक विजय शर्मा यांना १० लाखांचं बक्षीस मिळणार आहे.
Tokyo Olympic : सर आपलं स्वप्न पूर्ण झालं ! ऐतिहासिक कामगिरीनंतर Mirabai ने मानले कोचचे आभार
“खेळाडूंसोबत त्यांच्या प्रशिक्षकांनाही बक्षीस देणं गरजेचं आहे. त्यांच्यामुळेच हे खेळाडू घडत असतात. खेळाडूंसोबत प्रशिक्षकही अनेक गोष्टींचा त्याग करुन या खेळाडूंना घडवत असतात. त्यामुळे त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळणं गरजेचं आहे.” IOA चे सचिव राजीव मेहता यांनी पीटीआयशी बोलताना माहिती दिली.
इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने याआधीच गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंना ७५ लाखांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. याव्यतिरीक्त खेळाडू ज्या संस्थेचं प्रतिनिधीत्व करतात त्या संस्थेकडूनही त्यांना २५ लाखांचं बक्षीस मिळणार आहे. याचसोबत रौप्यपदक विजेत्या खेळाडूला ४० लाख तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूला २५ लाख मिळणार आहेत.
ADVERTISEMENT