भारतीय संघाचा नवा उस्ताद सूर्यकुमार यादव उर्फ सूर्या उर्फ स्काय याबद्दल क्रिकेटच्या दिग्गजांनी आपले मत व्यक्त केले आहे. सध्याच्या क्रिकेट पाहणारे कोणीही हे नाकारू शकत नाही की २०२२ हे वर्ष सूर्यकुमार यादवचे वर्ष होते. या वर्षी त्याने पांढऱ्या चेंडूचा सध्याचा महान खेळाडू विराट कोहलीला सेकंड फिडल म्हणून ठेवलं आणि ज्यांनी दोघांचा खेळ जवळून पाहिला असेल, तो दाव्याने म्हणू शकतो की ही भूमिका साकारण्यात विराटला कोणताही संकोच किंवा तक्रार नाही.
ADVERTISEMENT
कोहलीसारखा खेळाडू, ज्याला आक्रमक आणि लक्ष केंद्रित करायला आवडते, तो आनंदाने सूर्याला साथ देणारा खेळाडू होताना दिसला. गेल्या वर्षभरात सूर्याची उंची अनेक पटींनी वाढली आहे हे पाहायला मिळालं. अनेक दिग्गज खेळाडूंनी सुर्याबद्दल भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच्या खेळाचे अनेकजण यावर्षी चाहते झाले आहेत. तर क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडूंनी सुर्यकुमारबद्दल काय मत व्यक्त केलेत, ते आपण पाहूया.
“सूर्या मैदानावर 360-डिग्रीमध्ये फटके मारतो. एबी डिव्हिलियर्सने त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना जसा खेळायचा, अगदी तसाच सुर्यकुमार खेळतो. लॅप शॉट्स, लेट कट्स, रॅम्प शॉट्स कीपरच्या डोक्यावरून खोळतो. तो सरळ शॉट्स देखील मारू शकतो. तो लेग साइडवर तितकाच चांगला खेळतो, खोल बॅकवर्ड स्क्वेअरवर चांगला फ्लिक करतो. तसेच तो वेगवान आणि फिरकी गोलंदाजीवर देखील चांगला खेळातो,” असं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने सुर्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
“आम्ही आयपीएलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतो त्यामुळे मी त्याचे अनेक इंनिग्ज पाहिल्या आहेत. पण मी पहिल्यांदाच त्याचा खेळ इतक्या जवळून पाहिला. मी भारावून गेलो. खरे सांगायचे तर मला वाटते की तो आज ज्या प्रकारे खेळतो, तो जर खेळत राहिला तर. त्याच झोनमध्ये, ते क्षणार्धात जगातील कोणत्याही संघाविरुद्ध खेळ बदलू शकतो.”असं विराट कोहली म्हणाला.
“त्याची मानसिकता खूप सकारात्मक आहे. आणि त्याच्याकडे खुली आणि आक्रमक भूमिका आहे ज्यामुळे त्याला असामान्य शॉट्स खेळणे खूप सोपे होते. अशा प्रकारे त्याने असे टेक्निक विकसित केले आहे की गोलंदाजांना योग्य लांबीची गोलंदाजी करणे कठीण जात आहे कारण जर फुल लेन्थ बॉल आला की तो कव्हरला आणि त्याच्या आजूबाजूला आदळतो आणि जर शॉर्ट बॉल टाकला तर तो थर्ड मॅनला किंवा ओव्हर द पॉइंटला मारतो.म्हणजेच त्याचे टेक्निक असे आहे की त्यात दोष शोधणे फार कठीण वाटते,”असं न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्टीफन फ्लेमिंग म्हणाला.
“होय, लोक बरोबर आहेत (माझी तुलना सूर्यकुमार यादवशी करतात). आता त्याला फक्त सातत्य राखण्यावर भर देण्याची गरज आहे. त्याने पुढील 5 ते 10 वर्षे असेच खेळावे आणि मग त्याला स्व:ताचं नाव क्रिकेटच्या इतिहासाच्या पुस्ताकात सोनेरी अक्षरात पाहायला मिळेल, असं एबी डिव्हिलियर्स म्हणाला.
ADVERTISEMENT