भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची वेळ आली की टीव्हीवर एक जाहीरात सर्वांचं लक्ष वेधून घेते ती म्हणजे मौका…मौका. यंदाही २४ ऑक्टोबरला रंगणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान या जाहीरातीने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. परंतू या जाहीरातीमध्ये पाकिस्तानी चाहत्याची भूमिका करणारा अभिनेता कोण असा अनेकांना प्रश्न पडला असेल.
ADVERTISEMENT
अनेकांना हा अभिनेता पाकिस्तानी कलाकार असल्याचंही वाटतं होतं. परंतू या अभिनेत्याचं नावं आहे विशाल मल्होत्रा. इंजिनीअरिंगची नोकरी सोडून कला क्षेत्राकडे वळलेल्या विशालचं मौका-मौका या जाहीरातीने जगच बदलून टाकलं.
Ind vs Pak : पटाखे तो फुटने से रहें…मौका मौका वाला ‘तो’ परतलाय, व्हिडीओ पाहिलात का?
काही दिवसांपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना विशालने माहिती दिली की, तो एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होता. 2012 मध्ये तो मुंबईत आला. ‘रागिनी एमएमएस 2’ मध्ये त्यानं एक लहानशी भूमिका साकारली होती. यादरम्यान त्याचा संघर्षाच्या काळात त्याला या जाहिरातीची ऑफर आली. त्यांना कोणीतरी पाकिस्तानी चेहऱ्याचा दिसणारा अभिनेता हवा होता, याच निकषांच्या आधारे माझी निवड झाली, असं तो म्हणाला.
अवघ्या दोन दिवसांत चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ही जाहिरात प्रसिद्ध झाली आणि पाहता पाहता या जाहीरातीला अमाप लोकप्रियता मिळाली. सुरुवातीला ही जाहीरात इतकी प्रसिद्ध होईल याची खुद्द विशाललाही कल्पना नव्हती. सगळीकडे माझा चेहरा दिसायला लागला त्यावेळी खूप भारी वाटलं असंही विशालने सांगितलं. या जाहीरातीमुळे विशालचे पाकिस्तानाचही चाहते तयार झाले असून त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये जोरदार वाढ झाली.
T-20 World Cup : …म्हणून तुम्ही आमच्याविरुद्ध जिंकत नाही ! ‘विरु’ने काढला पाकिस्तानला चिमटा
एका जाहिरातीनं विशालचं पूरतं आयुष्य बदलून टाकलं. मुंबईत घर घेण्याचं त्याचं स्वप्न साकार झालं. कलाकारांच्या आयुष्यात अनेक चढ- उतार असतात. पण, या जाहिरातीनं आपल्याला मोठा आधार दिला, असं तो मोठ्या अभिमानानं सांगतो.
ADVERTISEMENT