ADVERTISEMENT
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषकाचा उपांत्य सामना गुरुवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी करत 172 धावांची मोठी धावसंख्या उभारली.
टीम इंडियाला सुरुवातीला संघर्ष करावा लागला, पण जेव्हा बेथ मुनी हिची विकेट घेण्यात यश आलं तेव्हा टीम इंडियान सुटकेचा निश्वास सोडला.
बेथ मुनीने 37 चेंडूत 54 धावांची खेळी खेळली, या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता.
शिखा पांडेच्या चेंडूवर शेफाली वर्माने बेथ मुनीचा झेल घेतला, असे केल्यावर ती आक्रमक झाल्याचं दिसून आली.
ट्विटरवर काही लोकांनी दावा केला की, शेफालीने रागाच्या भरात येथे शिवीगाळ केली, ज्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला.
ADVERTISEMENT