ADVERTISEMENT
भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया विरूद्ध 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
जबरदस्त खेळी खेळणाऱ्या रोहित शर्माला काहीवेळा त्याच्या वाढत्या वजनामुळे ट्रोल केलं जातं.
यावेळी तर रोहित शर्माला माजी क्रिकेटपटूंनेच सुनावलंय. यामुळे त्याला फिटनेसबद्दल मनावर घ्यावचं लागणार आहे.
भारताने 1983 चा विश्वचषक ज्यांच्या नेतृत्वाखाली जिंकला त्या कपिल देव यांनी रोहितला फिटनेसबद्दल खडसावलं.
कपिल देव यांनी फिटनेसच्या बाबतीत विराट कोहलीचं कौतुक केलं. प्रत्येकाने त्याच्यासारखं व्हावं असंही सांगितलं.
कपिल देव म्हणाले, ‘कर्णधार नेहमी फिट असला पाहिजे. फिटनेस नसेल तर, ती लाजिरवाणी बाब आहे.’
‘फिटनेसच्याबाबतीत रोहितला अजून मेहनत करावी लागेल. टीव्हावर वजन अधिक दिसून येते.’
‘रोहित एक चांगला कर्णधार आहे, तो फिट असला पाहिजे.’ असं म्हणत कपिल देव यांनी रोहितचे कान टोचले.
ADVERTISEMENT