उर्वरित सिझन आमच्या इथे आयोजित करा, IPL 2021 साठी BCCI ला पहिली ऑफर

मुंबई तक

• 12:55 PM • 06 May 2021

खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम स्थगित केला. यंदाचा उर्वरित हंगाम बीसीसीआय कधी आयोजित करेल याबद्दल चर्चांना उधाण आलेलं असताना, BCCI ला आयपीएलच्या आयोजनासाठी पहिली ऑफर आली आहे. इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट क्लबनी एकत्र येत इंग्लंड क्रिकेट बोर्डाला आयपीएलचा उर्वरित हंगाम इंग्लंडमध्ये आयोजित करण्याचं आमंत्रण द्यावं असं पत्र लिहीलं […]

Mumbaitak
follow google news

खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम स्थगित केला. यंदाचा उर्वरित हंगाम बीसीसीआय कधी आयोजित करेल याबद्दल चर्चांना उधाण आलेलं असताना, BCCI ला आयपीएलच्या आयोजनासाठी पहिली ऑफर आली आहे. इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट क्लबनी एकत्र येत इंग्लंड क्रिकेट बोर्डाला आयपीएलचा उर्वरित हंगाम इंग्लंडमध्ये आयोजित करण्याचं आमंत्रण द्यावं असं पत्र लिहीलं आहे. ESPNCricifo ने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

MCC, Surrey, Warwickshire, Lancashire आणि अन्य काऊंटी क्रिकेट क्लबने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला हे पत्र लिहून सप्टेंबरमध्ये आयपीएलचा उर्वरित हंगाम आयोजित करता येईल असं सांगितलं आहे. सप्टेंबरच्या मध्यावधीनंतर दोन आठवड्यांच्या कालावधीत ही स्पर्धा पूर्ण करता येऊ शकते असं काऊंटी क्रिकेट क्लबचं म्हणणं आहे. यासंदर्भात आयसीसीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. BCCI ला उर्वरित हंगाम पूर्ण करण्यासोबतच इंग्लंडच्या खेळाडूंना टी-२० वर्ल्डकपआधी आयपीएलच्या माध्यमातून चांगला सराव होईल असंही मत काऊंटी क्लबनी नोंदवलं आहे.

बीसीसीआयने आयपीएल स्थगित केल्यानंतर, उर्वरित हंगाम युएईत खेळवण्याचा विचार केला जात असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. परंतू बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने अद्याप यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही असं म्हटलंय. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुलीने, आयपीएलचं आयोजन भारतात करणं ही चूक नव्हती असं स्पष्ट केलंय. “भारतात आयपीएलचं आयोजन करणं ही चूक नव्हती. ज्यावेळी आम्ही स्पर्धा आयोजित करायचं ठरवलं त्यावेळी रुग्णसंख्या ही अगदीच कमी होती. आम्ही इंग्लंड दौराही अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजित केला. बायो सिक्युअर बबल मोडलं गेल्याच्या बातम्या समोर येत आहेत, पण असं काही झालं असेल असं मला वाटत नाही. जी माहिती मला मिळाली आहे त्यानुसार बायो बबल मोडलं गेलं नव्हतं. परंतू हे सर्व कसं झालं हे सांगणं खरंच कठीण आहे. देशातही लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण कशी होतेय हे सांगणं कठीण आहे.”

दरम्यान, बीसीसीआयला उर्वरित हंगाम पूर्ण करायचा असेल तर सध्याच्या घडीला त्यांच्यासमोर ३ पर्याय शिल्लक आहेत. जाणून घेऊयात कोणते आहेत हे ३ पर्याय….

पहिला पर्याय – १० दिवसांचा ब्रेक घेऊन आयपीएलचे उर्वरित सामने मुंबईत हलवता येतील

कोलकाता आणि चेन्नईच्या गोटात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआय या पर्यायाची चाचपणी करत होतं. ३ स्टेडीयम (वानखेडे, ब्रेबॉन, डी.वाय.पाटील) असल्यामुळे बीसीसीआय संपूर्ण स्पर्धा मुंबईत हलवण्याचा विचार करत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. बीसीसीआयने सध्या स्पर्धा स्थगित केली असली तरीही बीसीसीआय या पर्यायाचा अजुनही विचार करु शकतं. परंतू सध्याची परिस्थिती पाहता सर्व खेळाडूंना १० दिवसांचा ब्रेक मिळणं गरजेचं आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये लॉकडाउनमुळे रुग्णंसख्या आटोक्यात आली आहे. शहरात कोरोनाचा धोका टळला नसला तरीही इतर शहरांच्या तुलनेत मुंबईतलं वातावरण बीसीसीआयसाठी योग्य आहे. अशा परिस्थितीत १० दिवसांच्या ब्रेकमध्ये बीसीसीआय मुंबईत बायो सिक्युअर बबल तयार करुन योग्य ती खबरदारी घेत सर्व सामने मुंबईत हलवू शकतं.

दुसरा पर्याय – WTC फायनल पुढे ढकलून आयपीएल जून महिन्यात युएईमध्ये भरवता येईल

यंदाच्या वर्षात आयपीएलचा उर्वरित हंगाम संपवायचा असेल तर बीसीसीआयसमोर हा आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. परंतू यासाठी बीसीसीआयला आयसीसीच्या दरबारात आपलं वजन वापरण्याची वेळ येऊ शकते. जून महिन्यात आयपीएल स्पर्धा युएईत खेळवण्याचा विचार झाल्यास १८ जूनपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील World Test Championship च्या फायनल मॅचवर याचा फरक पडू शकतो. त्यामुळे बीसीसीआयला आयसीसी सोबतच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचीही मनधरणी करावी लागू शकते. परंतू बीसीसीआयने या पर्यायाचा विचार केला तरीही प्रॉब्लेम संपत नाहीयेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने १ जून ते २० जून या कालावधीत पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेचे उर्वरित सामने खेळवण्याची तयारी केली आहे. पाकिस्तान सुपर लिगचे सामनेही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करावे लागले होते. पण असं असलं तरीही आयपीएल जून महिन्यात खेळवता येऊ शकते. कारण फार कमी परदेशी खेळाडू हे आयपीएल आणि पीएसएल अशा दोन्ही स्पर्धांमध्ये खेळतात. त्यामुळे बीसीसीआयने जून महिन्यात आयपीएल खेळवायचं ठरवल्यास ते परदेशी खेळाडूंना कोणती स्पर्धा खेळायची आहे हे निवडण्याचा अधिकार देऊ शकतात. पण यासाठीही बीसीसीआयला पाक क्रिकेट बोर्डाशी चर्चा करावीच लागणार आहे.

तिसरा पर्याय – टी-२० वर्ल्डकपआधी ऑक्टोबर महिन्यात युएईत आयपीएलचं आयोजन करता येईल

यंदाच्या वर्षात भारताचा इंग्लंड दौरा हा १४ सप्टेंबरला संपतो आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषकाचं आयोजन आहे. ही स्पर्धा भारतामध्येच खेळवण्याबद्दल बीसीसीआयने तयारी केली असली तरीही कोरोनामुळे परिस्थिती बिघडत गेल्यास युएईत ही स्पर्धा खेळवण्याचा पर्याय बीसीसीआयने खुला ठेवला आहे. अशा परिस्थितीत टी-२० वर्ल्डकप युएईला भरवला गेला तर बीसीसीआय आयपीएलचा उर्वरित हंगामही ऑक्टोबरमध्ये युएईत खेळवू शकते. यामुळे एका स्पर्धेच्या बायो बबलमधून बाहेर पडल्यानंतर खेळाडू दुसऱ्या महत्वाच्या स्पर्धेसाठीच्या बायो बबलमध्ये प्रवेश करु शकतात. परंतू या पर्यायातही बीसीसीआयने अनेकांच्या परवानग्या आणि मनधरणी करावी लागणार आहे.

IPL 2021 : बनावट ID कार्डाद्वारे दोन बुकींनी भेदलं Bio Secure Bubble चं कवच

    follow whatsapp