भाड्याची शेती, मजूर बनले खेळाडू, कॉमेन्ट्रीला हर्षा भोगलेंचा आवाज आणि लाखोंचा गंडा; अशी रंगली फेक IPL

मुंबई तक

• 09:24 AM • 11 Jul 2022

गुजरात: जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (IPL). आयपीएल संबंधित अनेक वाद आणि घोटाळेतुम्ही ऐकले असतील, पण यावेळी गुजरातमधून अशी बातमी समोर आली आहे की ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल. गुजरात पोलिसांनीयेथे बनावट आयपीएल रॅकेटचा पर्दाफाश केला आहे . गुजरातमधील एका गावात गेल्या अनेक दिवसांपासून बनावट आयपीएललीगचे आयोजन केले जात होते . […]

Mumbaitak
follow google news

गुजरात: जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (IPL). आयपीएल संबंधित अनेक वाद आणि घोटाळेतुम्ही ऐकले असतील, पण यावेळी गुजरातमधून अशी बातमी समोर आली आहे की ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल. गुजरात पोलिसांनीयेथे बनावट आयपीएल रॅकेटचा पर्दाफाश केला आहे . गुजरातमधील एका गावात गेल्या अनेक दिवसांपासून बनावट आयपीएललीगचे आयोजन केले जात होते .

हे वाचलं का?

मोठी गोष्ट म्हणजे या लीगमध्ये बनावट चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्सआणि इतर आयपीएल संघही बनवण्यात आले होते. विशेष म्हणजे या लीगचे लाइव्ह स्ट्रीमिंगही होत होते. या बनावट आयपीएलच्या (Fake IPL Gujrat) माध्यमातून रशियन लोकांची फसवणूक करण्यात आली आहे.

इंग्रजी वेबसाइट TOI च्या रिपोर्टनुसार, या बनावट आयपीएलचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते. या लीगमध्येशेतात काम करणाऱ्या मजुरांना खेळाडू बनवण्यात आले होते. या लीगमध्ये समालोचनही केले जात होते. यासाठी प्रसिद्ध क्रिकेटतज्ज्ञ आणि समालोचक हर्षा भोगले यांच्या आवाजाची मिमिक्री करण्यात येत होती.

विशेष म्हणजे, सामना लाईव्ह दिसण्यासाठीपाच एचडी कॅमेरे वापरण्यात आले होते. लीग वास्तविक वाटण्यासाठी प्रेक्षकांच्या आवाजाचा ऑडिओ गुगल वरून डाऊनलोडकरून फुटेजमध्ये जोडण्यात आला होता. या लीगसाठी एक अधिकृत टेलिग्राम चॅनेल देखील तयार करण्यात आला होता, ज्याद्वारेसामन्यात सट्टेबाजी करणाऱ्या रशियन लोकांना लाखोंचा गंडा घातला जात होता.

लीगमध्ये शेतमजूर आणि बेरोजगार तरुणांचा समावेश

मेहसाणा जिल्ह्यातील मोलीपूर गावात या बनावट आयपीएल लीगचे आयोजन करण्यात आले होते. या लीगचा भंडाफोड होण्यापूर्वीलीग ‘नॉकआउट क्वार्टर फायनल’ पर्यंत पोहोचली होती. मूळ आयपीएल संपल्यानंतर तीन आठवड्यांनी या बनावट आयपीएलचेसामने सुरू झाले होते. या लीगमध्ये शेतमजूर आणि बेरोजगार तरुणांचा समावेश होता, ज्यांना चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्सआणि गुजरात टायटन्सच्या जर्सी घालून खेळवले जात होते. रशियन प्रेक्षकांना आयपीएल खरे वाटावे यासाठी बनावट अंपायरिंगहीकरण्यात आले होते. त्याचबरोबर पंचांनी कॅमेऱ्यांसमोर जाणूनबुजून बनावट वॉकी टॉकीज वापरल्या. मेरठमधील एक व्यक्ती लीगसामन्यांमध्ये हर्षा भोगलेंच्या आवाजाची मिमिक्री करत असे.

बनावट आयपीएल आयोजित करण्यासाठी शेत भाड्याने घेतले

पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी हवाला वाहिनीचीही चौकशी सुरू केली आहे. सट्टेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या शोएब दावडा नावाच्या व्यक्तीने हा बनावट कार्यक्रम आखला होता, असे पोलिसांनी सांगितले. तो याचा मुख्यसंयोजक असल्याचे समोर आले आहे. रशियन पबमध्ये आठ महिने काम केल्यानंतर तो मोलीपूरला परतला होता. बनावट आयपीएल आयोजित करण्यासाठी शोएबने एक शेत भाड्याने घेतले आणि त्यात मोठे दिवेही लावले होते. प्रत्येक सामन्यासाठी आयोजक शेतमजुरांना 400 रुपये देत असत. शोएबचा मित्र आसिफ मोहम्मद याने रशियातील सट्टेबाजांना क्रिकेटमधील बारकावेसांगितले आणि नंतर बनावट आयपीएल आयोजित करून त्यांची फसवणूक केली. सामन्यादरम्यान चौकार-षटकार कधी मारायचे, हेही आधीच ठरलेले होते.

    follow whatsapp