Ind vs Eng : Ravi Shastri यांच्यासह सपोर्ट स्टाफचे ३ सदस्य आयसोलेशनमध्ये, टीम इंडियाला मोठा धक्का

मुंबई तक

• 10:10 AM • 05 Sep 2021

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची lateral flow test पॉजिटीव्ह आली आहे. या टेस्टचा रिजल्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर रवी शास्त्री यांनी स्वतःला आयसोलेट केलं असून खबरदारीचा उपाय म्हणून बॉलिंग कोच भारत अरुण, फिल्डींग कोच आर.श्रीधर आणि फिजीओ थेरपिस्ट नितीन पटेल यांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. टीम […]

Mumbaitak
follow google news

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची lateral flow test पॉजिटीव्ह आली आहे. या टेस्टचा रिजल्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर रवी शास्त्री यांनी स्वतःला आयसोलेट केलं असून खबरदारीचा उपाय म्हणून बॉलिंग कोच भारत अरुण, फिल्डींग कोच आर.श्रीधर आणि फिजीओ थेरपिस्ट नितीन पटेल यांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधले चारही सदस्य संघासोबत मैदानात प्रवेश करणार नाहीयेत. या चारही सदस्यांच्या RTPCR टेस्ट झाल्या असून या टेस्टचा रिझल्ट येईपर्यंत त्यांना हॉटेलबाहेर येता येणार नाहीये अशी माहिती संघासोबतच्या असलेल्या मेडीकल टीमने दिली आहे.

या चार सदस्यांव्यतिरीक्त अन्य सदस्यांच्याही दोन Lateral Flow Test करण्यात आल्या आहेत. या सर्व सदस्यांच्या RTPCR चाचण्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना संघासोबत मैदानात प्रवेश मिळणार आहे.

दरम्यान, ओव्हल कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या भारतीय संघाने धडाकेबाज पुनरागमन केलं आहे. पहिल्या डावातील खराब कामगिरीला मागे टाकत भारताने कसोटी सामन्यावर पकड मजबूत बसवली आहे. सलामीवीर रोहित शर्माचं शतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसाअखेरीस १७१ धावांची आघाडी घेतली.

    follow whatsapp