आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये नियम ठरवण्याची जबाबदारी मॅरिलेबॉन क्रिकेट क्लब अर्थातच MCC या संस्थेकडे असते. नुकत्याच झालेल्या बैठकीत MCC ने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल केले असून येत्या १ ऑक्टोबरपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. नवीन नियमांमध्ये आता खेळाडूंना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
याआधी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयसीसीने बॉलर्स आणि फिल्डर्सना लाळेचा वापर करण्यास मनाई केली होती. परंतू आता हा निर्णय MCC ने कायम केला आहे. काय आहेत MCC ने जाहीर केलेले नवे नियम जाणून घेऊयात….
पहिला नियम – नव्या नियमानुसार कोणताही फलंदाज झेलबाद झाला, तर नव्या खेळाडूला फलंदाजीसाठी (स्ट्रायकर एंडला) उतरावे लागेल. जरीही कॅच घेताना फलंदाजांनी आपली जागा बदलली असली तरीही नवीन फलंदाज हा आता स्ट्राईकर एंडला उतरणार आहे.
दुसरा नियम – कोरोनामुळे चेंडूला लाळ लावण्यास मनाई करण्यात आली होती. आता मात्र यात सुधारणा करत MCC ने चेंडूला लाळ लावण्यास कायस्वरुपी बंदी घातली आहे. त्याऐवजी चेंडूला चकाकी आणण्यासाठी घाम लावता येईल.
तिसरा नियम – आतापर्यंत क्रिकेटमध्ये मंकडिंगला ‘अनफेअर प्ले’ म्हणून ओळख होती. चेंडू टाकताना नॉनस्ट्राईकर एंडला असणारा फलंदाज क्रीजमधून बाहेर पडत असेल आणि गोलंदाजाने बॉलने स्टंप्स उडवले तर त्याला मंकडिंग म्हटले जायचे. आता अशा पद्धतीने गोलंदाजाने नॉन स्ट्राईकर एंडच्या फलंदाजाला बाद केले तर त्याला अधिकृतरित्या धावबाद समजलं जाणार आहे. आयपीएलमध्ये आश्विनने जोस बटलरला अशा पद्धतीने आऊट केल्यामुळे वाद निर्माण झाला होता.
याव्यतिरीक्तही MCC ने काही नियमांमध्ये बदल केले आहेत. ज्यामुळे क्रिकेटच्या खेळावर मोठा परिणाम होईल असं बोललं जातंय. काय आहेत ते नियम जाणून घेऊयात…
-
चेंडू टाकल्यानंतर मैदानावर एखादा व्यक्ती किंवा प्राणी आला तर तो डेड बॉल घोषित केला जाईल. याआधी असा अडथळा आला तरी खेळ सुरुच ठेवला जायचा.
-
एखादा चेंडू खेळताना फलंदाजाने आपली जागा तसेच स्थिती बदलली तर फलंदाजाच्या जागेनुसारच तो चेंडू वाईड आहे की नाही हे ठरवले जाईल. स्टंप्सपासूनच्या लांबीनुसार चेंडू वाईड ठरवला जाणार नाही.
ADVERTISEMENT