विराट कोहलीची भारताच्या वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुन केलेली उचलबांगडी हा सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने अनेक गौप्यस्फोट करत आपली नाराजी जाहीर व्यक्त केली. विराटच्या या स्पष्टीकरणानंतर चाहते बीसीसीआयवर नाराज आहेत. आतापर्यंत भारताचं यशस्वी नेतृत्व केलेल्या विराटसाठी बीसीसीआयने चार कौतुकाचे शब्दही न वापरल्यामुळे अनेकांनी बीसीसीआय आणि विशेषकरुन सौरव गांगुलीला खलनायक ठरवलं आहे.
ADVERTISEMENT
परंतू कर्णधारांची उचलबांगडी आणि बीसीसीआय यांचं एक वेगळंच नातं आहे. याआधीही अनेक दिग्ग्ज खेळाडू आणि बीसीसीआयमध्ये वाद निर्माण झाला, ज्यानंतर बीसीसीआयने कर्णधारांना अशाच पद्धतीने हटवलं आहे.
१) राजघराण्यातून आल्यामुळे मिळाली भारताची कॅप्टन्सी –
सी.के. नायडू हे भारताच्या कसोटी संघाचे पहिले कर्णधार मानले जातात. नायडू आपल्या फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखले जायचे. फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये १२ हजार पेक्षा जास्त धावा आणि ४०० विकेट ही त्यांची कामगिरी होती. भारताकडून नायडू यांनी सात कसोटी सामने खेळले ज्यात दोन अर्धशतकही झळकावली. परंतू नायडूंच्या आधी भारतीय संघाची जबाबदारी होती ती महाराजकुमार ऑफ विजयनगरम यांच्याकडे. परंतू ही जबाबदारी त्यांना फक्त राजघराण्यातून आलेले असल्यामुळे मिळाली होती.
Virat Kohli च्या पत्रकार परिषदेतील गौप्यस्फोटावर गांगुलीची प्रतिक्रीया, म्हणाला…
सी.के.नायडू आणि महाराजकुमार यांच्या खेळात जमिन आस्मानाचा फरत होता. प्रत्येक बाबतीत सी.के.नायडू हे महाराजकुमार यांच्यापेक्षा वरचढ मानले जायचे. भारतीय संघाचं कर्णधारपद मिळालं इतकी पात्रता महाराजकुमार यांच्याकडे नव्हती. परंतू केवळ राजघराण्याकडे पाहून त्यांना ही जबाबदारी मिळाली. महाराजकुमार यांनी भारताकडून तीन कसोटी सामने खेळले आणि या तिन्ही सामन्यांमध्ये ते संघाचे कर्णधार होते. परंतू यानंतर त्यांना पदावरुन हटवण्यात आलं.
२०२१ वर्ष ठरलंय Virat साठी अत्यंत खडतर ! या ८ गोष्टी गमावल्या
२) दौऱ्यावरुन परतताना विमानात पायलटने घोषणा केली आणि भारतीय संघाचा कर्णधार बदलला गेला –
एस. वेंकटराघवन यांना भारतीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्याचा किस्सा हा अतिशय गाजला आहे. १९७४ साली वेंकटराघवन यांना दोन कसोटी सामन्यांसाठी संघाचं कर्णधारपद मिळालं. ज्यात भारतीय संघाचा पराभव झाला. यानंतर १९७९ मध्ये वेंकटराघवन यांना वन-डे संघाचं कर्णधारपद मिळालं आणि सुनील गावसकर त्यावेळी कसोटी संघाचे कर्णधार होते. १९७९ मध्ये टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेली होती.
‘कोणाकडेही बोट दाखवणं चांगलं नाही’, Virat Kohli च्या पत्रकार परिषदेतील भूमिकेवर कपिल देव नाराज
या दौऱ्यावरुन परतताना वेकंटराघवन यांचं कर्णधारपद काढून घेत गावसकर यांना देण्यात आलं. महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघ दौऱ्यावरुन परतत असताना विमानाच्या पायलटने घोषणा करत आता वेंकटराघवन भारतीय संघाचे कर्णधार नसतील असं जाहीर केलं.
३) निवड समितीसोबतचा वाद आणि गावसकरांनी कर्णधारपद सोडलं –
भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी १९७८ ते १९८५ या काळात अनेक टप्प्यांत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. या काळात अनेकदा गावसकरांना कर्णधारपदावरुन हटवून पुन्हा संधी देण्यात आली. ८० च्या दशकात कपिल देव आणि सुनील गावसकर यांच्यात कर्णधारपदावरुन बरचं द्वंद्व रंगलं होतं. इतकच नव्हे तर गावसकर आणि निवड समितीमध्येही या काळात बराच वाद झाला होता. यानंतर १९८५ साली गावसकरांनी निवड समितीसोबतच्या वादाला कंटाळून कर्णधारपद सोडलं. परंतू त्याआधीही ज्यावेळेस बीसीसीआयने गावसकरांकडून कर्णधारपद काढून घेतलं त्यावेळी त्यामागचं कारण दिलं नव्हतं.
गांगुलीने चित्र स्पष्ट करावं ! Virat Kohli सोबतच्या वादावर सुनील गावसकरांचं मत
४) जेव्हा सचिनला मीडियाकडून समजतं की आपलं कर्णधारपद गेलं –
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची परिस्थिती जवळपास सारखी आहे. १९९७ साली श्रीलंका दौऱ्यानंतर बीसीसीआयने सचिनला कर्णधारपदावरुन हटवलं. यामागचं कारणही बीसीसीआयने सचिनला दिलं नाही. बीसीसीआयच्या या वागणुकीमुळे सचिन खूप नाराज झाला होता. आपल्या आत्मचरित्रात सचिनने याचा उल्लेखही केला आहे.
मालिका संपल्यानंतर मला कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. बीसीसीआयकडून मला कोणताही कॉल आला नाही, मला प्रसारमाध्यमांकडून ही बातमी समजली. त्यावेळी मला खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं होतं, मी त्यावेळेस साहित्य सहवास सोसायटीत रहायचो. त्यावेळेस ज्या पद्धतीने गोष्टी हाताळल्या गेल्या त्या योग्य नव्हत्या. खरंतय या गोष्टीचा क्रिकेटर म्हणून मला फायदाच झाला. मी नेहमी स्वतःला हेच समजवायचो की बीसीसीआय मधली लोकं तुझ्याकडून कर्णधारपद काढून घेऊ शकतात तुझं क्रिकेट नाही.
५) चॅपलसोबतचा वाद नडला आणि दादा संघाबाहेर गेला –
ग्रेग चॅपल आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यात झालेला वाद हा जगजाहीर आहे. २००५ साली जेव्हा भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता, त्यावेळी चॅपल यांनी गांगुलीऐवजी मी युवराज सिंह किंवा मोहम्मद कैफला कसोटी संघात जागा देणं पसंत करेन असं सांगितलं होतं. चॅपल यांच्या या वक्तव्यानंतर सौरव गांगुली इतका चिडला होता की त्याने थेट आपलं सामान पॅक करुन भारतात परतायला सुरुवात केली होती. परंतू यावेळी संघाचे मॅनेजर अमिताभ चौधरी, राहुल द्रविड आणि चॅपल यांनी दादाची समजूत काढत त्याला थांबवलं.
गांगुलीने आपल्याला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा बदला घेत बुलावायो कसोटीत १०१ धावांची इनिंग खेळली. यानंतर मीडियाशी बोलत असताना गांगुलीने मला कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं सांगितलं आणि भारतीय क्रिकेटमध्ये नवीन वादाला सुरुवात झाली. यानंतर ग्रेग चॅपल यांनी बीसीसीआयला एक इ-मेल केला जो प्रसारमाध्यमांमध्ये लिक झाला.
या इ-मेलमध्ये चॅपल यांनी गांगुली हा शारिरिकदृष्ट्या कमकुवत असल्याचं सांगितलं होतं. गांगुली हा कर्णधारपदासाठी पात्र नसून त्याला हटवण्यात यावं अशी विनंती चॅपल यांनी बीसीसीआयला केली होती. ज्यानंतर बीसीसीआयने सौरव गांगुलीला कर्णधारपदावरुन हटवलं इतकच नव्हे तर गांगुली वन-डे संघातून बाहेर गेला. यात महत्वाची गोष्ट म्हणजे सौरव गांगुलीच्याच शिफारसीवर ग्रेग चॅपल भारताचे प्रशिक्षक बनले होते. यानंतर गांगुलीने पुन्हा एकदा भारतीय संघात पदार्पण केलं.
ADVERTISEMENT