जपानच्या टोकियो शहरात नुकतीच ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. कोरोनाच्या सावटाखालीही या स्पर्धेचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं. भारताने या स्पर्धेत ७ पदकांची कमाई करत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवली. जपानी लोकं आणि त्यांची शिस्त याबद्दल आपण अनेकदा ऐकलं आहे, वाचलं आहे. जमैकाचा Athlete हान्सले प्राचमेंटला याचा प्रत्यय आला आहे.
ADVERTISEMENT
११० मी. अडथळ्यांच्या शर्यतीची अंतिम फेरी असताना हान्सलेने चुकीची बस पकडली आणि तो वेगळ्या ठिकाणी उतरला. परंतू आपल्याला जिथे खेळायचं आहे ती ही जागा नाही हे त्याला लक्षात आलं. यानंतर स्थानिक व्हॉलेंटीअर मुलीने हान्सलेची मदत करत त्याला टॅक्सीसाठी पैसे देत योग्य पत्ता सांगितला. हान्सलेने नंतर स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन धडाकेबाज कामगिरी करत गोल्ड मेडलही जिंकलं.
हान्सलेने मेडल जिंकल्यानंतर या मुलीला शोधून काढत तिचे विशेष आभार मानले आहेत. या मुलीचं नाव टियाना असं असून ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये व्हॉलेंटीअर म्हणून काम करत होती. टियानाला भेटून हान्सलेने आपलं जिंकलेलं गोल्ड मेडल तिला दाखवलं आणि टॅक्सीसाठी दिलेले पैसे तिला परत करत जमैकाचा ऑलिम्पिक टी-शर्टही तिला भेट म्हणून दिला.
तुझ्यामुळे मी अंतिम फेरीसाठी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेत पोहचलो असं म्हणत हान्सलेने टियानाचे आभार मानले आहेत. परंतू हान्सलेला मदत केल्याबद्दल टियानाला अनपेक्षितरित्या आणखी एक मोठं बक्षीस मिळालं आहे. जमैकाचे पर्यटन मंत्री एडमंड बार्टलेट यांनी टियानाला जमैकाला येण्याचं आमंत्रण दिलं आहे.
Tokyo Olympics मध्ये अमेरिका आणि चीनचं वर्चस्व, भारताची आतापर्यंत विक्रमी कामगिरी
टियाना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू दे, आमच्या खेळाडूला मदत करण्यासाठी तिने जी तत्परता दाखवली त्याची परतफेड आम्हाला करायची आहे अशी प्रतिक्रीया एडमंड यांनी ‘Sunday Gleaner’ शी बोलताना दिली.
Tokyo Olympic Explainer : तिरंदाजीत दक्षिण कोरिया कसं गाजवतं एकहाती सत्ता? काय आहे त्यांच्या यशामागचं रहस्य?
चुकीच्या ठिकाणी पोहचल्यानंतर आपण अंतिम फेरीत खेळू शकणार नाही अशी भीती हान्सलेला वाटली होती. त्यातच कोरोनाच्या नियमांमुळे दुसरी गाडी मिळणं शक्य नव्हतं. अशावेळी हान्सलेकडे चालत जाऊन स्पर्धेच्या ठिकाणी पोहचण्याचा पर्याय होता. परंतू यावेळी त्याला टियाना भेटली, हान्सलेने टियानाला विनंती केली. ज्यानंतर तिने हान्सलेला टॅक्सीसाठी पैसे दिले…जे घेतल्यानंतर हान्सलेने स्पर्धेच्या ठिकाणी पोहचत १३.०४ अशी वेळ नोंदवत गोल्ड मेडल जिंकलं.
Catch Them Young… काय आहे ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार करणारी हरयाणा सरकारची योजना?
ADVERTISEMENT