हरभजन सिंग वादाच्या भोवऱ्यात, खलिस्तानी दहशतवाद्यांचा ‘शहीद’ म्हणून उल्लेख

मुंबई तक

• 09:41 AM • 07 Jun 2021

सध्या भारतीय संघातून बाहेर फेकला गेलेला हरभजन सिंग वादात सापडला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या एका वादग्रस्त पोस्टमुळे सोशल मीडियावर हरभजनविरोधात नाराजीचा सूर पसरला असून त्याच्यावर कारवाईची मागणी होते आहे. अमृतसरमधील सुवर्णमंदीरात ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळी कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. ऑपरेशन ब्लू स्टारच्या निमीत्ताने झालेल्या कारवाईला ३७ वर्ष […]

Mumbaitak
follow google news

सध्या भारतीय संघातून बाहेर फेकला गेलेला हरभजन सिंग वादात सापडला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या एका वादग्रस्त पोस्टमुळे सोशल मीडियावर हरभजनविरोधात नाराजीचा सूर पसरला असून त्याच्यावर कारवाईची मागणी होते आहे.

हे वाचलं का?

अमृतसरमधील सुवर्णमंदीरात ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळी कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. ऑपरेशन ब्लू स्टारच्या निमीत्ताने झालेल्या कारवाईला ३७ वर्ष पूर्ण झाली असून, या निमीत्ताने हरभजनने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये खलिस्तानी दहशतवादी जर्नेलसिंग भिंदरवालेचा फोटो आहे. या पोस्टमध्ये दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहत असताना हरभजनने त्यांना शहीद असं म्हटलं आहे.

हरभजनने काही वेळातच ही पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काढून टाकली. परंतू या पोस्टचा स्क्रिनशॉट चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर हरभजनने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नसली तरीही त्याच्यावर कारवाईची मागणी सोशल मीडियावर होते आहे.

हरभजन सिंग गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात हरभजन सिंग कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो आहे. आयपीएलचा चौदावा हंगाम स्थगित होण्यापूर्वी हरभजन कोलकाता नाईट रायडर्सकडून ३ सामने खेळला आहे.

    follow whatsapp