ADVERTISEMENT
भारतीय संघाला T20 महिला विश्वचषकच्या उपांत्य फेरीत निसटता पराभवाचा सामना करावा लागला.
ऑस्ट्रेलियाने या उपांत्य फेरीत भारताचा 5 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं.
या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने 34 चेंडूत 52 धावा करत अर्धशतक झळकावलं.
173 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने 14.3 षट्कांत 4 विकेट गमावत 133 धावा केल्या होत्या.
कर्णधार हरमनप्रीत आणि ऋचा घोष खेळत होत्या. भारत हा सामना जिंकेल असंच चित्र होतं.
मात्र, 133 धावांवर भारतीय संघाचा निम्मा संघ बाद झाला. हरमनप्रीत 52 धावांवर बाद झाली.
हरमनप्रीतने जॉर्जियाच्या चेंडूवर शॉट खेळून एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव घेतली.
यावेळी, हरमनरप्रीतची बॅट क्रीजच्या बाहेर अडकली आणि ती धावबाद झाली.
जर बॅट अडकली नसती तर, सहज भारताचा विजय निश्चित होता.
धावबाद झाल्यानंतर हरमनप्रीतला इतका राग आला की, तिने मैदानातचं बॅट फेकून दिली.
ADVERTISEMENT