मधल्या फळीने ३ बाद १० या परिस्थितीसाठी तयार असावं – रोहित शर्मा

मुंबई तक

• 09:48 AM • 11 Dec 2021

बीसीसीआयने टी-२० पाठोपाठ वन-डे संघाचं कर्णधारपदही रोहित शर्माच्या हातात सोपवलं आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी स्पर्धांमध्ये विजय मिळवण्यास अपयशी ठरला. २०१७ चॅम्पिनअन्स ट्रॉफी, २०१९ विश्वचषक स्पर्धा आणि युएईत पार पडलेला टी-२० विश्वचषक अशा सलग तीन स्पर्धांमध्ये टीम इंडिया अपयशी ठरली. या तिन्ही पराभवांमधला समान धागा म्हणजे भारताने आपल्या आघाडीच्या फळीतले फलंदाज लवकर गमावले होते. […]

Mumbaitak
follow google news

बीसीसीआयने टी-२० पाठोपाठ वन-डे संघाचं कर्णधारपदही रोहित शर्माच्या हातात सोपवलं आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी स्पर्धांमध्ये विजय मिळवण्यास अपयशी ठरला. २०१७ चॅम्पिनअन्स ट्रॉफी, २०१९ विश्वचषक स्पर्धा आणि युएईत पार पडलेला टी-२० विश्वचषक अशा सलग तीन स्पर्धांमध्ये टीम इंडिया अपयशी ठरली.

हे वाचलं का?

या तिन्ही पराभवांमधला समान धागा म्हणजे भारताने आपल्या आघाडीच्या फळीतले फलंदाज लवकर गमावले होते. भारताचा नवोदीत कर्णधार रोहित शर्माने आपल्या मधल्या फळीतील फलंदाजांना याच परिस्थितीसाठी तयार रहायला सांगितलं आहे.

Rohit Sharma: विराटला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित म्हणाला, त्याच्यासारख्या…

प्रसिद्ध क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्या Backstage with Boria या कार्यक्रमात रोहित बोलत होता. २०१९ विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात नेमकं काय चुकलं हे तुला समजलं का? असं विचारलं असता रोहित म्हणाला, “खरं सांगायचं, तर अजुन तरी नाही. माझ्या मते सुरुवातीच्या क्षणांमध्ये जिथे आम्ही विकेट गमावल्या तिकडेच आम्ही सामना हरलो. त्यामुळे मला ही गोष्ट लक्षात ठेवून अतिशय खराब परिस्थिती येईल हा विचार करुन संघ तयार करायचा आहे. ३ बाद १० अशा अवस्थेसाठी आम्ही तयार असायला हवं. त्यामुळे पुढे जाताना मला हा संदेश माझ्या सहकाऱ्यांना द्यायचा आहे की ३ बाद १० किंवा २ बाद १० अशा खडतर अवस्थेत संघ सापडला असला तरीही आपण १८०-१९० धावांपर्यंत पोहचू शकतो. यासाठी तिसऱ्या-चौथ्या-पाचव्या-सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्यांनी तयार असायला हवं.”

‘या’ दोन कारणांमुळे Rohit Sharma ला वन-डे संघाचा कॅप्टन बनवणं ठरु शकतं टीम इंडियासाठी फायदेशीर

हाच विचार ठेवून मला संघ तयार करायचा आहे. आपण असं धरुन चालू की आम्ही उपांत्य फेरीचा सामना खेळतोय आणि पहिल्या दोन ओव्हरमध्ये १० रन करुन आम्ही २ विकेट गमावल्या. अशा परिस्थितीत आमच्याकडे काय योजना आहे. प्रत्येकाने स्वतःला अशा परिस्थितीत ठेवून तयारी करणं गरजेचं आहे. विश्वचषकाआधी आमच्याकडे काही सामने आहेत, त्याआधी आम्हाला ही तयारी करायची आहे. कारण आम्ही जे तिन्ही सामने गमावले त्यातली समानता म्हणजे आम्ही लवकर विकेट गमावल्या, असं रोहितने सांगितलं.

रोहित नेहमी संघाच्या हिताचा विचार करतो, Virat ला कॅप्टन्सीवरुन हटवण्याचा निर्णय योग्यच – रवी शास्त्री

मला या गोष्टीची जाणीव आहे की या तिन्ही सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांची गोलंदाजी अत्युच्च दर्जाची होती. पण मला हे चौथ्यांदा होऊ द्यायचं नाहीये. यासाठी आम्हाला तयारी करायची असल्याचं रोहितने सांगितलं. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वन-डे मालिकेसाठी रोहित शर्मा पहिल्यांदा पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या मालिकेत रोहित शर्मा कर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

मला प्रशिक्षकपद मिळू नये म्हणून 2017 मध्ये प्रयत्न केले गेले; रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट

    follow whatsapp