Tokyo Olympics: ‘उतावीळ लोकांना एकच सांगते…,’ Manu Bhakerच्या पराभवानंतर हिनाने सुनावलं

मुंबई तक

• 05:01 AM • 25 Jul 2021

Tokyo Olympic 2020: भारताची स्टार नेमबाज मनु भाकर हिने सर्वांनाच निराश केलं आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल पात्रता सामन्यात (Qualification Match) तिला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. मनु भाकरने 575/600 गुणांसह 12वे स्थान मिळविले. अंतिम फेरी गाठण्यासाठी टॉप 8 मध्ये येणं आवश्यक होतं. खरं तर अवघ्या देशाला मनुकडून पदकाची अपेक्षा होती परंतु तिला […]

Mumbaitak
follow google news

Tokyo Olympic 2020: भारताची स्टार नेमबाज मनु भाकर हिने सर्वांनाच निराश केलं आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल पात्रता सामन्यात (Qualification Match) तिला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. मनु भाकरने 575/600 गुणांसह 12वे स्थान मिळविले. अंतिम फेरी गाठण्यासाठी टॉप 8 मध्ये येणं आवश्यक होतं. खरं तर अवघ्या देशाला मनुकडून पदकाची अपेक्षा होती परंतु तिला पात्रता फेरीतच पराभव स्वीकारावा लागला. पण यावेळी माजी नंबर वन नेमबाद हिना सिद्धू हिने मनुची पाठराखण केली आहे.

हे वाचलं का?

‘मनुने शानदार खेळ दाखविला’

मनुच्या या सामन्यानंतर जगातील माजी नंबर वन नेमबाज हिना सिद्धूने तिची पाठराखण केली आहे. मनु भाकरच्या पिस्तूलमधील तांत्रिक बिघाडावर तिने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘मला वाटते की मनु आणि देसवाल यांनी धैर्याने लढा दिला. विशेषत: मनुला तिच्या पिस्तूलमध्ये काही अडचण आल्यानंतर देखील. मला असे वाटते की हा अनुभव त्याला मिश्र संघ स्पर्धेसाठी त्यांना आणि मजबूत बनवेल.’

तिने पुढे असंही म्हटलं की, ‘ती अंतिम फेरी गाठण्याच्या अगदी जवळ होती. पण अ‍ॅथलीट्सचा संख्येनुसार त्यांना जज करणं थांबवा, कदाचित हीच गोष्ट आहे की, जी आपण समजू शकता. कामगिरी समजून घ्या.’

हिना सिद्धू हिने आणखी एक ट्विट केलं आहे. ‘मनु दबावाला बळी पडली असं सांगण्यासाठी जे उतावीळ आहेत त्या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे की, तिच्या पिस्तूलमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्यामुळे तिला बराच वेळ गमवावा लागला.’

पात्रात फेरीत काय घडलं?

या महत्त्वाच्या सामन्यात मनुला तिच्या पिस्तूलने साथ दिली नाही. दुसर्‍या सीरीजच्या मध्येच मनुच्या पिस्तूलच्या इलेक्ट्रॉनिक ट्रिगरमधील सर्किट खराब झालं. ज्याचा तिचा कामगिरी परिणाम झाला. यावेळी टेंटमध्ये जाऊन तिला पिस्तुलचं सर्किट बदलावं लागलं.

ही संपूर्ण प्रक्रिया मनु भाकरला महागात पडली आणि तिला 575 गुणांवर समाधान मानावे लागले. खरं तर मनुने 5व्या सीरिजमध्ये पुनरागमन केलं होतं. या सीरीजमध्ये तिने 98 गुण मिळवले. पण मनुसाठी आजचा दिवस फारच कठीण होता. कारण की, तिला ऐनवेळी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे तिसऱ्या सीरिजमध्ये तिला तब्बल 5 मिनिटं शुटिंगच करता आलं नाही.

Tokyo Olympic : तांत्रिक बिघाडामुळे भारताने गमावलं एक पदक, पात्रता फेरीत मनू भाकेरच्या पिस्तुलात बिघाड

या सामन्यात मनुशिवाय यशस्विनी सिंग देसवालदेखील सहभागी झाली होती. पण तिला देखील पराभवाला सामोरे जावं लागलं. देसवाल हिने 574 गुणांची कमाई केली ज्यामुळे तिला 13व्या स्थानी समाधान मानावं लागलं. दरम्यान, यावेळी चीनची जियान रानशिंग हिने अव्वल स्थान पटकावलं. तिने 587 गुण मिळवले. त्याच वेळी ग्रीसची अन्ना कोराक्की दुसर्‍या आणि रशिया ऑलिम्पिक समितीची बी व्हिटालिना तिसरं स्थान पटकावलं.

    follow whatsapp