‘सचिनला शिव्या देत होतो अन् त्याने…’; सकलेन मुश्ताकने सांगितला भन्नाट किस्सा

मुंबई तक

• 01:49 AM • 16 Mar 2023

Saqlain Mushtaq on Sachin Tendulkar : क्रिकेट सामन्यात बॅट्समन-बॉलर एकमेकांवर वरचढ होण्यासाठी सर्रास स्लेजिंग (Sledging) करतात. अनेकदा तर या स्लेजिंगचं रूपांतर मोठ्या भांडणात देखील झालं आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात असे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. या दोन्ही कट्टर देशांमध्ये सामना असल्यास मैदानाचं रूपांतर युद्ध भूमीत होतो. अशाच एका मॅचमधील भन्नाट किस्सा पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सकलेन […]

Mumbaitak
follow google news

Saqlain Mushtaq on Sachin Tendulkar : क्रिकेट सामन्यात बॅट्समन-बॉलर एकमेकांवर वरचढ होण्यासाठी सर्रास स्लेजिंग (Sledging) करतात. अनेकदा तर या स्लेजिंगचं रूपांतर मोठ्या भांडणात देखील झालं आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात असे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. या दोन्ही कट्टर देशांमध्ये सामना असल्यास मैदानाचं रूपांतर युद्ध भूमीत होतो. अशाच एका मॅचमधील भन्नाट किस्सा पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक (Saqlain Mushtaq) याने एका पॉडकास्टच्या मुलाखतीत सांगितला. (Saqlain Mushtaq told this amazing story)

हे वाचलं का?

जेंव्हा गोलंदाज सचिनला स्लेजिंग करतो

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्लेजिंग न करता त्याच्यावर कसा वरचढ ठरला याचा किस्सा सकलेनने सांगितला. पी फॉर पकाऊच्या मुलाखतीत सकलेन मुश्ताक बोलत होता. ‘मी नुकतंच इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळून आलो होतो. नवीन रक्त होता, त्यात बाहेर देशात खेळून आल्याने अतिआत्मविश्वास. भारतासोबत कॅनडामध्ये टेस्ट मॅच होता. मी पहिली ओव्हर टाकताना सचिन माझ्या समोर बॅटिंग करत होता. यादरम्यान मी त्याला स्लेजिंग करू लागलो. काही हर्ष शब्द देखील वापरले. यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये मी सचिनवर हावी ठरलो, असं मुश्ताक म्हणाला.

पुढे बोलताना सकलेन मुश्ताक म्हणाला, ओव्हर संपल्यावर सचिन माझ्याजवळ आला. माझ्याकडे येऊन तो म्हणाला, ‘सकलेन तुझ्या तोंडून अशी भाषा शोभत नाही. तू एक चांगला गोलंदाज आहेस. मी तुझा आदर करतो. तुझ्याकडून ही अपेक्षा नाही, मी तुला खूप सभ्य समजतो.’ असं सचिन म्हणाला. असं बोलल्यानंतर मी पुढे काही ओव्हर काही बोलता गोलंदाजी केली, असं सकलेन म्हणाला.

सचिन तेंडुलकर रमला जुन्या आठवणीत, शिवाजी पार्कच्या BEST बसमध्ये खास फोटोसेशन

सचिनने खेळला माईंड गेम

पण तोपर्यंत सचिनने आपलं माईंड गेम खेळला होता. पुढचे पाच ओव्हर त्याने मला प्रत्येक ओव्हरमध्ये चौकार खेचले आणि चांगला सेट झाला. सचिनने आपल्यासोबत माईंड गेम खेळलाय हे कळेपर्यंत तो सेट झाला होता, असं सकलेन म्हणाला. संध्याकाळी हॉटेलमध्ये याविषयावर हसत गप्पा मारल्या, असं तो म्हणाला. यासह त्याने सचिनचं खूप कौतुक देखील केलं.

‘सचिन जगातील सर्वात महान फलंदाज’ : सकलेन मुश्ताक

तो पुढे म्हणाला, सचिनपेक्षा महान फलंदाज कोणी नाहीये, असं मीच नाही तर संपूर्ण जग मानतो. पुस्तकात टेक्निकल शॉट सांगायचं असेल तर सचिनचं उदाहरण दिलं जातं. विराट कोहली आणि सचिनची तुलना होऊ शकत नाही, कारण सचिनने जगातील खतरनाक गोलंदाजांचा सामना केला आहे, असा दावा सकलेन मुश्ताकने केला आहे. यादरम्यान बोलताना त्याने सचिनचं तोंडभरून कौतुक केलं.

विराट की सचिन तेंडुलकर? सर्वांधिक प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड कोणी जिंकलेत?

    follow whatsapp