World Cup 2023 Schedule : वनडे वर्ल्ड कपचे यजमान पद यंदाच्या वर्षी भारताकडे आहे. हा वर्ल्डकप येत्या ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये रंगणार आहे. या वर्ल्ड कपपुर्वी आता मोठी अपडेट समोर आली आहे. वनडे वर्ल्ड कपमधील सेमीफायनल सामन्याची मैदाने बदलण्यात येणार असल्याची माहिती सुत्राकडून मिळत आहे. त्यामुळे आता हे सामने इतर मैदानात होण्याची शक्यता आहे.(icc odi world cup 2023 semifinals schedule kolkatta eden garden and mumbai wankhede stadium)
ADVERTISEMENT
वनडे वर्ल्डकपचे सेमी फायनलचे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीअमवर खेळवण्यात येणार होते. मात्र हे सामने खेळवणे शक्य नसल्याची माहिती आता बीसीसीआयच्या सुत्राकडून मिळत आहे. याचसोबत हे सामने नेमक्या कोणत्या मैदानात खेळवण्यात येणार आहे, याची माहितीही समोर आली आहे.सुत्रानुसार, वनडे वर्ल्ड कप 2023 चा सेमीफायनल सामना कोलकत्ताच्या ईडन गार्डनवर खेळवला जाऊ शकतो. तर दुसरा सेमी फायनल सामना हा मुंबईच्या वानखेडे स्टेडीअमवर खेळवला जाणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : ”विराट कोहलीवर जळतो गौतम गंभीर म्हणून…’, ‘त्या’ वादावर क्रिकेटरचं मोठं विधान
5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपला सुरूवात
ईएसपीएन क्रिकइंफोने रिपोर्टने दिलेल्या माहितीनूसार, वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर पासून होणार आहे. या वर्ल्ड कपचा पहिला सामना अहमदाबादच्या मैदानावर गतविजेता इंग्लंड आणि गेल्या वेळचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईत ऑस्ट्रेलिया विरूद्ध रंगणार आहे. या वर्ल्ड़ कपमधुन भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये 15 ऑक्टोंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे.
तसेच इतर सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, 29 ऑक्टोबरला धर्मशालामध्ये ऑस्ट्रेलिया-न्य़ुझीलंड, 1 नोव्हेंबरला पुण्यात न्युझीलंड-साऊथ आफ्रिका तर 4 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आमने-सामने येणार आहे. भारतीय संघाचे ग्रुप स्टेजमधले सामने 9 शहरात खेळवले जाणार आहेत. तर पाकिस्तान संघाचे ग्रुप स्टेजमधले सामने पाच ठिकाणांवर आयोजित असणार आहेत.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 10 संघामध्ये 48 सामने खेळवले जाणार आहेत. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि साऊथ आफ्रिका हे संघ याआधीच वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाले आहेत. तर इतर संघाचा निर्णय जिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या क्वालिफाय टूर्नामेंटमधून होणार आहे.सध्या क्वालिफाय टुर्नामेंटमध्ये वेस्टइंडीज, श्रीलंका, नेदरलॅंड, आयरलॅंड, नेपाल,ओमान, स्कॉटलँड, संयुक्त अरब अमीरात आणि झिम्बाब्वेचा समावेश आहे.
ADVERTISEMENT