WTC 2021-23 : ICC कडून नवीन पॉईंट सिस्टीम लागू

मुंबई तक

• 12:29 PM • 30 Jun 2021

इंग्लंडच्या साऊदम्प्टनमध्ये पार पडलेल्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने बाजी मारली. अंतिम फेरीत न्यूझीलंडने भारतावर ८ विकेट राखून मात केली. टेस्ट चॅम्पिअनशीपचं पहिलं सत्र पार पडल्यानंतर आयसीसीने नवीन सत्राची तयारी सुरु केली आहे. ऑगस्ट महिन्यात भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिल्या सत्रात आयसीसीच्या […]

Mumbaitak
follow google news

इंग्लंडच्या साऊदम्प्टनमध्ये पार पडलेल्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने बाजी मारली. अंतिम फेरीत न्यूझीलंडने भारतावर ८ विकेट राखून मात केली. टेस्ट चॅम्पिअनशीपचं पहिलं सत्र पार पडल्यानंतर आयसीसीने नवीन सत्राची तयारी सुरु केली आहे.

हे वाचलं का?

ऑगस्ट महिन्यात भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिल्या सत्रात आयसीसीच्या पॉईंट सिस्टीमवरुन अनेक संघांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी हंगामासाठी आयसीसीने नवीन पॉईंट सिस्टीम लागू करण्याचं ठरवलं आहे.

अशी असेल आयसीसीची नवीन पॉईंट सिस्टीम –

१) सामना जिंकल्यानंतर – १२ गुण

२) सामना अनिर्णित राहिल्यास – ४ गुण

३) सामना बरोबरीत सुटल्यास – ६ गुण

४) याव्यतिरीक्त यंदा स्लो-ओव्हर रेटसाठी संघांना दंड बसणार आहे. ठरवून दिलेल्या वेळेत ओव्हर्सचा कोटा पूर्ण झाला नाही तर संघाच्या गुणांमधून एक गुण कापला जाईल.

WTC Final : जाणून घ्या भारतीय संघाच्या पराभवाची ५ प्रमुख कारणं

ऑगस्ट २०२१ ते जून २०२३ या काळात टेस्ट चॅम्पिअनशीपचं दुसरं सत्र खेळवलं जाणार आहे. ९ संघ या स्पर्धेत सहभागी होतील, ज्यापैकी प्रत्येक संघ ३ मालिका या घरच्या मैदानावर तर ३ मालिका या बाहेरच्या मैदानावर खेळेल.

WTC Schedule : आगामी स्पर्धेसाठी Team India समोर कोणाचं आव्हान? जाणून घ्या वेळापत्रक…

    follow whatsapp