Ind vs Aus : PM मोदी रोहित, कोहली, शमीला काय म्हणाले? ड्रेसिंग रूममधला संवाद आला समोर

प्रशांत गोमाणे

• 06:10 AM • 21 Nov 2023

तुम्ही 10 सामने जिंकून आला आहात. आणि पराभव हा होत असतो. तुम्ही उत्साहित राहा आणि एकमेकांचा उत्साह वाढवा. संपूर्ण देश तुम्हाला पाहतोय, असे मोदींनी खेळाडूंना धीर देताना म्हटले.

ind vs aus final pm narendra modi visit team india dressing room video viral mohammed shami rohit sharma

ind vs aus final pm narendra modi visit team india dressing room video viral mohammed shami rohit sharma

follow google news

PM Narendra Modi In Team India Dressing Room Video : आयसीसीच्या वर्ल्ड कप फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) 6 विकेट राखून टीम इंडियाचा (Team India) पराभव केला. या पराभवाने क्रिकेट फॅन्ससह टीम इंडिया खचली आहे. मैदानात देखील रोहित शर्मा, मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) अश्रू अनावर झाले होते. त्यामुळे वर्ल्ड कपमधील पराभवानंतर खेळाडूंच सात्वन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये दाखल झाले होते. यावेळी पंतप्रधानांनी खेळाडूंना धीर दिला आहे. या संबंधित व्हिडिओ देखील समोर आला आहे. (ind vs aus final pm narendra modi visit team india dressing room video viral mohammed shami rohit sharma)

हे वाचलं का?

ऑस्ट्रेलिया विरूद्ध फायनल सामन्यात टीम इंडिया पराभूत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रूम गाठलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचे सात्वन केले. या संबंधित व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी खेळाडूंशी हस्तांदोलन करत त्यांना धीर दिला आहे.

हे ही वाचा :  World Cup 2027 : पुढचा विश्वचषक होणार खास! कधी, कुठे अन् किती असणार टीम… जाणून घ्या

व्हिडिओत तुम्ही पाहु शकता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला टीम इंडियाचे सीनीयर खेळाडू कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा हात हातात घेऊन त्यांनी वर्ल्ड कपमधील कामगिरीचे कौतुक केले. यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडशी मराठीतून संवाद झाला. काय राहुल कसा आहे? अशी त्यांची पंतप्रधानांनी विचारपूस केली.

पंतप्रधानांनी पुढे जडेजाला बाबू नावाने हाक मारली आणि त्याच्याशी हस्तांदोलन केले. तसेच बुमराहला पंतप्रधानांनी गुजराती येते का? अशी विचारणा केली. यावर त्याने थोडं थोडं असे उत्तर दिले. यावर पंतप्रधानांनी हे तर तुझ घर (होम ग्राऊंड) आहे, असे म्हटले.

मोदी यांनी नंतर मोहम्मद शमीची भेट घेतली आहे. ‘मोहम्मद शमी तु चांगला खेळलास’ असे कौतुक करत पंतप्रधानांनी त्याची गळाभेट घेतली आणि त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. यानंतर पंतप्रधानांनी इतर अनेक खेळाडूंची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले.

हे ही वाचा : Sanjay Raut : ‘यालाच म्हणतात आ बैल…’ , बावनकुळेंच्या फोटोवरून राऊत पुन्हा भिडले, नव्या ट्वीटमध्ये काय?

या भेटी दरम्यान पंतप्रधान खेळाडूंना म्हणाले, तुम्ही 10 सामने जिंकून आला आहात. आणि पराभव हा होत असतो. तुम्ही उत्साहित राहा आणि एकमेकांचा उत्साह वाढवा. संपूर्ण देश तुम्हाला पाहतोय, असे मोदींनी खेळाडूंना धीर देताना म्हटले. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना दिल्ली भेटीचे निमंत्रणही दिले.

    follow whatsapp