Ind vs Aus : विश्व कप विजेत्या ऑस्ट्रेलियावर पडला पैशाचा पाऊस, टीम इंडियाला किती कोटी मिळाले?

प्रशांत गोमाणे

• 08:17 AM • 20 Nov 2023

आयसीसीने वर्ल्ड कप आधीच बक्षीस रक्कमेची घोषणा केली होती. वर्ल्ड कपसाठी 10 मिलियन डॉलर (83.29 करोड रूपये) प्राईज मनी निश्चित करण्यात आली होती. ही रक्कम 10 संघामध्ये वाटली जाणार होती.

ind vs aus final World cup 2023 prize money winning team australia and runner up team india prize money

ind vs aus final World cup 2023 prize money winning team australia and runner up team india prize money

follow google news

World Cup 2023 Prize Money : आयसीसीने आयोजित केलेल्या वर्ल्ड कप 2023 वर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियाने रविवारी फायनल सामन्यात सहा विकेटस राखून टीम इंडियाचा पराभव केला. टीम इंडियाच्या या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची किमया साधली आहे. दरम्यान या विजयानंतर आता ऑस्ट्रेलियाला किती बक्षीस रक्कम मिळणार आहे ? तसेच उपविजेत्या ठरलेल्या टीम इंडियाला किती प्राईज मनी मिळणार आहे, हे जाणून घेऊयात. (ind vs aus final World cup 2023 prize money winning team australia and runner up team india prize money)

हे वाचलं का?

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघावर पैशाचा पाऊस पडला आहे. विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघाला 40 लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 33.33 करोड बक्षीस रक्कम म्हणून मिळाली आहे. तसेच या वर्ल्ड कपमध्ये उपविजेत्या ठरलेल्या टीम इंडियाला 20 लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 16.65 रूपये बक्षीस म्हणून मिळालीय. या रक्कमेसह लीग स्टेजमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यासाठी देखील त्यांना बक्षीस रक्कम मिळणार आहे.

हे ही वाचा : Mitchell Marsh : वर्ल्ड कप विजयाचा माज, ट्रॉफीवरच ठेवला पाय! ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या ‘त्या’ कृतीवर पेटला वाद

83.29 करोड प्राईज मनीची घोषणा

आयसीसीने वर्ल्ड कप आधीच बक्षीस रक्कमेची घोषणा केली होती. वर्ल्ड कपसाठी 10 मिलियन डॉलर (83.29 करोड रूपये) प्राईज मनी निश्चित करण्यात आली होती. ही रक्कम 10 संघामध्ये वाटली जाणार होती. त्यानुसार वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला 4 मिलियन डॉलर, उप विजेता टीमला 2 मिलियन डॉलर मिळणार आहेत. तसेच सेमी फायनलमध्ये पराभव होणाऱ्या दोन संघांना 8-8 लाख डॉलर दिले गेले आहेत. तसेट ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजयावर 33.31 लाख रूपये देण्यात आले आहेत.

वर्ल्ड कप प्राईज मनी ( भारतीय चलन)

वर्ल्ड कप विजेता : 33 करोड रूपये (ऑस्ट्रेलिया)
वर्ल्ड कप उप विजेता : 16.65 करोड रूपये (भारत)
सेमी फायनलीस्ट : 6.66 करोड (साऊथ आफ्रिका, न्युझीलंड)
ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजय : 33.31 लाख रूपये

हे ही वाचा : Rohit Sharma : ‘खरं सांगायचं तर…’, रोहितने सांगितल्या चुका, कुणाला ठरवलं जबाबदार?

भारताला किती मिळाली रक्कम?

टीम इंडियाला फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी 20 लाख डॉलर मिळाले आहेत. यासोबत लीग स्टेजमध्ये टीम इंडियाने 10 सामन्यात विजय मिळवला होता. ज्यामुळे त्यांना 4 लाख डॉलर ( एकंदरीत 3.33 करोड) प्राईज मनी मिळाली आहे. याचाच अर्थ भारताला या वर्ल्ड कपमध्ये एकून मिळून 24 लाख डॉलर (जवळ जवळ 20 करोड रूपये) बक्षीस रक्कम मिळाली आहे.

    follow whatsapp