Dukes Ball In WTC Final Ind vs Aus : येत्या 7 जूनला लंडनच्या ओवल मैदानात टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलियात (Australia) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) फायनल सामना खेळवला जाणार आहे. या फायनल सामन्यापूर्वी महत्वाची माहिती समोर आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हा फायनल सामना ड्युक बॉलने खेळवला जाणार आहे. दरम्यान भारतात तर Sanspareils Greenlands म्हणजेच SG बॉलने खेळले जाते. त्यामुळे आता Dukes Ball आणि SG बॉलमध्ये नेमका फरक काय आहे? ते जाणून घेऊयात. (ind vs aus wtc final will play with duke ball cricket ball types dukes kookaburra sg cricket ball)
ADVERTISEMENT
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी टीम इंडियाने आयपीएलमध्ये SG बॉलने स्पर्धा खेळली होती. मात्र प्रॅक्टीस दरम्यान त्यांनी ड्यूक बॉलचा वापर केला होता. जेणेकरून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ड्यूक बॉलने खेळताना टीम इंडियाला कोणतीही अडचण येणार नाही. आता या Dukes Ball आणि SG बॉलमधला फरक काय ते पाहूयात.
क्रिकेटमध्ये किती बॉल वापरले जातात?
वर्ल्ड क्रिकेटमध्ये तीन बॉलचा वापर केला जातो. कुकाबुरा, ड्यूक आणि एसजी अशी या तीन बॉलची नावे आहेत. या तीनही बॉलचा वापर विविध देशात सामने खेळताना केला जातो. तसचे वर्ल्ड क्रिकेटमध्ये टेस्ट सामन्यात कुकाबुरा बॉलचा सर्वाधिक वापर होता. जगातील 8 देशात या कुकाबुरा बॉलने क्रिकेट खेळली जाते.
हे ही वाचा : WTC Final पूर्वी ऑस्ट्रेलियाची रणनीती, टीम इंडियाच्या पराभवासाठी रचला डाव
कोणत्या देशात कोणता बॉल वापरला जातो?
कूकाबुरा बॉल : ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, पाकिस्तान, साऊथ आफ्रिका, न्युझीलंड, बांग्लादेश, जिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान
ड्यूक बॉल : इंग्लंड, आयरलंड आणि वेस्टइंडीज
एसजी बॉल : या बॉलने निव्वळ भारतात क्रिकेट खेळली जाते.
तीनही बॉलची खासियत काय?
ड्युक बॉल : इंग्लंडमध्ये बनवलेल्या ड्युक बॉलला उंच शिवण असते.या बॉलची शिलाई हाताने होते. या बॉलने वेगवान गोलंदाजांना खुप मदत मिळते. ड्यूक बॉलचा कडकपणा 60 ओव्हरपर्यंत राहतो. 20-30 ओव्हरनंतरच गोलंदाजांना या बॉलमधून रिव्हर्स स्विंग मिळू लागते.
एसजी बॉल : रिव्हर्स स्विंगच्या बाबतीत कुकाबुरा आणि SG बॉल थोडी वेगळी असते. दोन्ही बॉलमध्ये 50 ओव्हर्सनंतर रिव्हर्स स्विंग मिळायला सुरुवात होते. एसजी बॉल भारतात बनवला जातो. य़ा बॉलची शिलाई ड्यूक बॉलप्रमाणे हाताने केली जाते. या बॉलची सीम उंचावलेली असते. हा बॉल वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटूंना अधिक मदत करतो.
कूकाबुरा : कुकाबूरा बॉल ऑस्ट्रेलियात बनवली जाते. या बॉलची शिलाई मशीनने होते. या बॉलची शिवन दाबलेली असते. सुरुवातीच्या 20 ते 30 ओव्हर वेगवान गोलंदाजांना फायद्याच्या असतात. त्यानंतर त्या फलंदाजांना फायदेशीर ठरतात. बॉलची सीम दाबल्यामुळे हा बॉल इतर बॉलच्या तुलनेत फिरकीपटूंना कमी उपयोगी पडतो.
हे ही वाचा : ‘निवृत्ती घेण्यासाठी ही योग्य वेळ’, IPL 2023 जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनीची मोठी घोषणा
ICC चा नियम काय?
इंटरनेशनल क्रिकेट काउन्सिल (ICC)च्या नुसार, बॉलच्या वापराबाबत अनेक नियम आहेच. ज्या देशात मॅच अथवा सीरीज होते, तो देश आपल्या पसंतीनुसार बॉलचा वापर करतो. काही देश सामन्य़ांसाठी वेग-वेगळ्या बॉलचाही वापर करतो.
ADVERTISEMENT