अखेरच्या दिवशी टीम इंडियाच्या तळातल्या फलंदाजांना झटपट आऊट करुन विजयाची स्वप्न पाहणाऱ्या इंग्लंडच्या मनसुब्यांना धक्का बसला आहे. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने केलेल्या भागीदारीच्या जोरावर भारताच्या शेपटाने इंग्लंडला चांगलाच तडाखा दिला. ज्यामुळे भारताने आपला दुसरा डाव ८ बाद २९८ वर घोषित करत इंग्लंडला विजयासाठी २७२ रन्सचं आव्हान दिलं.
ADVERTISEMENT
चौथ्या दिवसाअखेरीस भारताने ६ विकेट गमावत १८१ धावांपर्यंत मजल मारली होती. ऋषभ पंत आणि इशांत शर्मा ही जोडी मैदानात असल्यामुळे अखेरच्या दिवशी भारताच्या तळातल्या फलंदाजांना झटपट आऊट करण्यासाठी इंग्लंडचे बॉलर उत्सुक होते. रॉबिन्सनने ऋषभ पंतला आऊट करत भारताला मोठा धक्काही दिला. परंतू यानंतर भारताच्या तळातल्या फलंदाजांनी इंग्लंडच्या नाकीनऊ आणले.
Video : क्रिकेटच्या पंढरीत प्रेक्षकांचं लाजिरवाणं कृत्य, लोकेश राहुलला फेकून मारले शॅम्पेन कॉर्क
इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी छोटेखानी भागीदारी रचत भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. रॉबिन्सनने इशांतचा अडसर दूर केल्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने पुन्हा एकदा मैदानावर तळ ठोकून अर्धशतकी भागीदारी करत भारताची बाजू मजबुत केली. मोहम्मद शमीने इंग्लंडच्या बॉलर्सवर अनपेक्षित हल्लाबोल करत धावा जमवण्यास सुरुवात केली. अँडरसन, रॉबिन्सन आणि वुडचा नेटाने सामना करत शमीने ७० बॉलमध्ये ६ फोर आणि १ सिक्स लगावत नाबाद ५६ रन्स केल्या. बुमराहने शमीला ३४ रन्स करत चांगली साथ दिली.
अखेरच्या दिवसात उरलेल्या ओव्हर्स आणि षटकांचा अंदाज घेऊन विराटने २९८ वर भारताचा डाव घोषित केला. यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय गोलंदाजांनीही आक्रमक सुरुवात केली. जसप्रीत बुमराहने रोरी बर्न्स तर मोहम्मद शमीने डोम सिबलेला शून्यावर आऊट करत इंग्लंडची अवस्था १ बाद २ अशी केली.
Ind vs Eng : Lords कसोटीत इंग्लंडच्या खेळाडूंकडून Ball Tampering चा प्रयत्न? व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ADVERTISEMENT