टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलने लॉर्ड्सच्या मैदानावर दणक्यात पुनरागमन केलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या बॉलिंग लाईन अपचा सामना करताला लोकेश राहुलने शतकी खेळी केली. रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी १२६ रन्सची पार्टनरशीप केल्यानंतर लोकेश राहुलने मैदानावर टिकून राहत शतकाला गवसणी घातली.
ADVERTISEMENT
पहिल्या कसोटी सामन्यातही लोकेश राहुलचं शतक हुकलं होतं. त्यामुळे लॉर्ड्सच्या मैदानावर हाराकिरी न करता राहुलने संयमीपणे सामना करत शतक केलं.
या शतकी खेळीसोबत राहुलने अनेक विक्रम आपल्या नावे जमा केले आहेत. जाणून घेऊयात या विक्रमांची यादी…
लोकेश राहुलच्या दृष्टीकोनातून हे शतक खूप महत्वाचं आहे. दोन वर्षांपूर्वी खराब कामगिरीमुळे कसोटी संघातून स्थान गमावलेल्या लोकेशने नंतर भारतीय संघात पुनरागमन केलं. परंतू कसोटी संघात त्याला जागा मिळवता येत नव्हती. इंग्लंड दौऱ्यात शुबमन गिल आणि मयांक अग्रवालला झालेल्या दुखापतीमुळे लोकेशला भारतीय संघात संधी मिळाली. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात बहारदार इनिंग खेळत लोकेशने आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करुन दाखवलं आहे.
पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात लोकेश राहुलने पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मासोबत शतकी भागीदारी करुन भारताला चांगली सुरुवात करुन दिली. जेम्स अँडरसनने रोहित आणि पुजाराला आऊट केल्यानंतरही राहुल मैदानावर टिकून राहिला आणि विराटच्या साथीने त्याने आपलं शतक पूर्ण केलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारत किती धावसंख्येपर्यंत मजल मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT