नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाक सामना, भारताचा माजी क्रिकेटर कोणावर भडकला?

मुंबई तक

28 Jun 2023 (अपडेटेड: 28 Jun 2023, 02:42 PM)

Icc World cup 2023 India vs Pakistan Match : आयसीसीने यदांच्या वर्षी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपचे (odi world cup 2023) वेळापत्रक मंगळवारी जारी केले आहे. हे वेळापत्रक जारी करताच भारतीय फॅन्सना टीम इंडिया आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 15 ऑक्टोबर रोजी रंगणाऱ्या सामन्याची उत्सुकता लागली आहे.

ind vs pak icc odi world cup match 2023 pakistani team scared to play team india at narendra modi stadium

ind vs pak icc odi world cup match 2023 pakistani team scared to play team india at narendra modi stadium

follow google news

Icc World cup 2023 India vs Pakistan Match : आयसीसीने यदांच्या वर्षी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपचे (odi world cup 2023) वेळापत्रक मंगळवारी जारी केले आहे. हे वेळापत्रक जारी करताच भारतीय फॅन्सना टीम इंडिया आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 15 ऑक्टोबर रोजी रंगणाऱ्या सामन्याची उत्सुकता लागली आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता असतानाच पाकिस्तानकडून नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळवण्यावर आक्षेप नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या या कृत्यावर आता भारताच्या माजी क्रिकेटर अतुल वासन यांनी टीका केली आहे. (ind vs pak icc odi world cup match 2023 pakistani team scared to play team india at narendra modi stadium)

हे वाचलं का?

आयसीसीने वनडे वर्ल्ड कपचे (odi world cup 2023) वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पाकिस्तान वगळता सर्वच संघानी याला पाठिंबा दिला आहे. तर पाकिस्तानकडून या वेळापत्रकाला अद्याप ग्रीन सिग्नल मिळाला नाही आहे. त्यामुळे पाकिस्तानचे भारतात येणे अद्याप निश्चित नाही. सुत्रानुसार पाकिस्तानने वर्ल्ड कप शेड्युल मंजूरीसाठी पाकिस्तानी सरकारकडे पाठवले आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमधील आमचा सहभाग आणि 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणे, वर्ल्ड कपच्या सेमी फायनल सामना मुंबईत खेळणे या सर्व गोष्टी सरकारच्या मंजुरीवर अवलंबून असणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अशा धोरणार आता भारताच्या माजी क्रिकेटर अतुल वासन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा  : India in World Cup 2023 : विश्व चषक स्पर्धेत भारताला कोणता संघ जाणार जड?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) नरेंद्र मोदी स्टेडियमवर न खेळण्याच्या मागणीला अतुल वासन यांनी टीका केली आहे. अतुल वासन म्हणाले की, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिय़मवर सामना खेळणार नाही, असे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने म्हटले. आणि सामन्याचे ठिकाण बदलण्याची मागणी करून ते राजकारण करत आहेत.याप्रकरणी आयसीसी बीसीसीआयला पाठिंबा देईल अशी भूमिका अतुल वासन यांनी मांडली आहे.

भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत सध्या चांगलीच उत्सुकता आहे. लोक स्पर्धेपेक्षा सामन्याबद्दल जास्त बोलत आहेत. मला वाटतं आता आपण खूप पुढे आलो आहोत, भारतीय क्रिकेटची भरभराट होत आहे, असे देखील अतुल वासन म्हणाले आहेत. यासोबत पाकिस्तानचे स्वत:चे वेगळे मुद्दे आहेत. मी याला आता शत्रुत्व मानत नाही. आम्ही त्यांना हरवल्यानंतर ना जास्त खुशी होतो ना पराभूत झाल्यावर जास्त दुखी होतो, अशी प्रतिक्रिया देखील अतुल वासन यांनी दिली आहे. दरम्यान आता या वर्ल्ड कपच्या वेळापत्रकावर आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्याबाबत पाकिस्तान काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp