IND VS SL T20: भारताने धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 मध्ये विजय मिळवून श्रीलंकेला व्हॉईटवॉश दिला आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने तिन्ही सामने जिंकून एक विक्रम केला आहे. टीम इंडियाची ही सलग तिसरी क्लीन स्वीप मालिका आहे. तर रविवारी झालेल्या या सामन्यातील विजयासह भारताने सलग 12 टी-20 विजयांची नोंद केली आहे.
ADVERTISEMENT
या सामन्यात श्रीलंकेने भारताला 147 धावांचे लक्ष्य दिले होते जे भारताने 4 गडी गमावून पूर्ण केले. पुन्हा एकदा श्रेयस अय्यर हाच विजयाचा हिरो ठरला. श्रेयसने मालिकेत तिसऱ्यांदा अर्धशतक ठोकून आपल्या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
या सामन्यात पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्माला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकला नाही. तो स्वस्तात आपली विकेट गमावून बसला. रोहित 5 धावा करून बाद झाला, तर त्यानंतर संजू सॅमसनही 18 धावा करून बाद झाला.
श्रीलंकेचा खराब सुरुवात:
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली. मात्र त्यांचा निर्णय योग्य ठरला नाही. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेची टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलमडली. श्रीलंकेचा निम्मा संघ अवघ्या 60 धावांवर गारद झाला होता. पण शेवटी श्रीलंकेने पुनरागमन करत शेवटच्या पाच षटकात चांगल्या धावा केल्या.
श्रीलंकेकडून कर्णधार दसुन शनाका पुन्हा एकदा चमकला त्याने 38 चेंडूत तब्बल 74 धावा केल्या. शनाकाने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्याशिवाय दिनेश चंडिमल आणि चमिका करुणारत्ने यांनीही चांगली खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेला 20 षटकात किमान 146 धावा करता आल्या.
भारताचा सलग 12वा T20 विजय
या विजयासह टीम इंडियाने टी-20 क्रिकेटमध्ये सलग 12 विजयांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आतापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग विजयांचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर होता, ज्याने 12 विजयांची नोंद केली. आता भारताच्या नावावर देखील सलग 12 विजयांची नोंद झाली आहे.
भारताचे शेवटचे 12 T-20 सामने
1. वि अफगाणिस्तान- विजय (कर्णधार- विराट कोहली)
2. विरुद्ध स्कॉटलंड- विजय (कर्णधार- विराट कोहली)
3. वि नामिबिया – विजय (कर्णधार – विराट कोहली)
4. वि न्यूझीलंड- विजय (कर्णधार- रोहित शर्मा)
5. वि न्यूझीलंड- विजय (कर्णधार- रोहित शर्मा)
6. वि न्यूझीलंड- विजय (कर्णधार- रोहित शर्मा)
7. वि वेस्ट इंडिज – विजय (कर्णधार – रोहित शर्मा)
8. वि वेस्ट इंडिज – विजय (कर्णधार – रोहित शर्मा)
9. वि वेस्ट इंडिज – विजय (कर्णधार – रोहित शर्मा)
10. विरुद्ध श्रीलंका- विजय (कर्णधार- रोहित शर्मा)
11. विरुद्ध श्रीलंका- विजय (कर्णधार- रोहित शर्मा)
12. विरुद्ध श्रीलंका- विजय (कर्णधार- रोहित शर्मा)
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सलग तिसरा क्लीन स्वीप
टीम इंडियाने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सलग तिसरा क्लीन स्वीप केला आहे. T20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा टीम इंडियाचा पूर्णवेळ कर्णधार झाला. तेव्हापासून तो फक्त विजय नोंदवत आहे. प्रथम न्यूझीलंड, नंतर वेस्ट इंडिज आणि आता श्रीलंकेला रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने क्लीन स्वीप दिला आहे.
Ind vs SL: टीम इंडियाकडून लंकादहन! सॅमसन-जाडेजाकडून श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई
रोहितच्या नेतृत्वाखाली सलग तिसरा T-20 विजय
• न्यूझीलंड: 3-0
• वेस्ट इंडिज: 3-0
• श्रीलंका: 3-0
ADVERTISEMENT