Ind vs Wi Team India : रोहित शर्मा कर्णधार! कोहलीही खेळणार; इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

मुंबई तक

• 06:12 PM • 26 Jan 2022

वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या आगामी टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. रोहित शर्माचं कर्णधार म्हणून पुनर्रागमन झालं असून, विराट कोहलीही टी-२० आणि एकदिवसीय सामन्यात खेळणार आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली असून, भुवनेश्वर कुमारला एकदिवसीय मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन्ही मालिकेमध्ये विराट कोहली […]

Mumbaitak
follow google news

वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या आगामी टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. रोहित शर्माचं कर्णधार म्हणून पुनर्रागमन झालं असून, विराट कोहलीही टी-२० आणि एकदिवसीय सामन्यात खेळणार आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली असून, भुवनेश्वर कुमारला एकदिवसीय मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन्ही मालिकेमध्ये विराट कोहली खेळणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. टी-२० आणि एकदिवसीय मालिका संघात कोहलीचा समावेश केला असून, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दुसरीकडे रोहित शर्मानेही कर्णधार म्हणून पुनर्रागमन केलं आहे. भुवनेश्वर कुमार टी-२० मालिकेत असून, एकदिवसीय मालिकेतून मात्र, बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

टी-20 मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ…

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ…

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतूराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन्ही मालिकेतून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. तर केएल राहुल दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापासून खेळणार आहे. त्याचबरोबर गुडघ्याला झालेल्या जखमेमुळे रवींद्र जाडेजा पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे दोन्ही मालिकातून त्याची निवड करण्यात आली नाही. अक्षर पटेलला फक्त टी-२० संघातच स्थान मिळालं आहे.

कुलदीप यादवचं पुनर्रागमन

कुलदीप यादवचं सहा महिन्यानंतर भारतीय संघात पुनर्रागमन झालं आहे. कुलदीप यादवला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं आहे. यापूर्वी कुलदीप जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत खेळला होता. गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर कुलदीपची टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.

भारत दौऱ्यावर येणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्ध भारत तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. ६, ९ आणि ११ फेब्रुवारी रोजी हे सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर टी-२० मालिका होणार असून, कोलकातातील ईडन गार्डन्स मैदानावर १६, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी हे सामने खेळवण्यात येणार आहे.

    follow whatsapp